Maruti Suzuki WagonR: Maruti Suzuki ची फॅमिली हॅचबॅक WagonR ही गेल्या महिन्यात म्हणजेच एप्रिल २०२३ मध्ये देशातील सर्वाधिक विकली जाणारी कार बनली. मारुती वॅगन आर हॅचबॅकने मागील एप्रिलमध्ये टाटा नेक्सॉन आणि ह्युंदाई क्रेटा तसेच टाटा पंच सारख्या संबंधित सेगमेंटमध्ये सर्वाधिक विक्री होणाऱ्या SUV ला मागे टाकले. गेल्या महिन्यात २०,८७९ लोकांनी मारुती वॅगनआर हॅचबॅक खरेदी केली. काही महिन्यांपासून बलेनो आणि स्विफ्ट सारख्या कारचा दबदबा होता, पण वॅगनआरने पुन्हा आपला दर्जा दाखवला आणि देशवासीयांची आवडती कार बनली आहे.
वॅगनआर ही कंपनीच्या सर्वोत्तम वाहनांपैकी एक मानली जाते. यासोबतच या कारमध्ये तुम्हाला मजबूत मायलेज तसेच उत्कृष्ट फीचर्स पाहायला मिळतात. मारुती सुझुकी वॅगनआर कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी वाहन मानली जाते. यासोबत ही कार तुम्हाला सुमारे ३५ किमी मायलेज देते. एवढेच नाही तर कंपनीने या कारची किंमतही खूपच कमी ठेवली आहे. त्यामुळे ही कार देशात खूप पसंत केली जात आहे.
(हे ही वाचा : मारुतीच्या ‘या’ स्वस्त कारची विक्री घसरली, ३० दिवसात फक्त ‘इतक्या’ गाड्या विकल्या )
Maruti Suzuki WagonR इंजिन
या कारमध्ये ९९८ सीसी इंजिन उपलब्ध करून देण्यात आले आहे. हे इंजिन ५६ Bhp कमाल पॉवर निर्माण करण्यास देखील सक्षम आहे. ही ५ सीटर हॅचबॅक आहे जी पेट्रोल आणि सीएनजी दोन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध आहे.
Maruti Suzuki WagonR वैशिष्ट्ये
कंपनीने या कारमध्ये अनेक उत्कृष्ट फीचर्स देखील दिले आहेत. या कारमध्ये फुल एलईडी लाइटिंग, रियर पार्किंग सेन्सर कॅमेरा, मोठी टचस्क्रीन, इन्फोटेनमेंट यांसारखे अनेक उत्तम फिचर्स देण्यात आले आहेत.
Maruti Suzuki WagonR किंमत
या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत जवळपास ५.५२ लाख रुपये ठेवली आहे. त्याच वेळी, त्याचे टॉप मॉडेल खरेदी करण्यासाठी, तुम्हाला ८ लाख रुपये खर्च करावे लागतील.