Car Discounts Dec 2022: नवीन वर्ष सुरू व्हायला आता फक्त काही दिवस उरले आहेत आणि स्वस्तात कार खरेदी करण्यासाठी ही फारच कमी दिवस राहिले आहेत. अनेक कार कंपन्या डिसेंबरमध्ये तुमच्यासाठी बंपर ऑफर घेऊन आल्या आहेत. चला तर जाणून घेऊया, देशातील सर्वाधिक कार विक्री करणाऱ्या कंपन्यांनी या डिसेंबर महिन्यात कोणती तगडी ऑफर दिली आहे.

‘या’ कारवर मिळतेय दमदार सूट

१. Maruti Suzuki Alto 800: मारुती सुझकीच्या मारुती अल्टो ८०० च्या टॉप मॉडेलवर ४२,००० रुपयांची बचत होणार आहे. या कारच्या बेस मॉडेलवर कंपनीने १७,००० रुपयांचा डिस्काउंट जाहीर केला असून या कारच्या सीएनजी मॉडेलवर देखील कंपनीने ४०,१०० रुपयांचा डिस्काउंट जाहीर केला आहे.

pushpa 2 song controversy
चेंगराचेंगरीनंतर ‘पुष्पा २’बद्दल नवा वाद, निर्मात्यांना युट्युबवरून हटवावं लागलं ‘हे’ लोकप्रिय गाणं; कारण काय?
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
loksatta editorial on rupee getting weaker day by day against the dollar
अग्रलेख : बबड्या रुपया, कारटा डॉलर
prathamesh parab regret for not getting enough screens
“महाराष्ट्रात स्क्रिन्स मिळत नाहीयेत यापेक्षा दुर्दैव…”, प्रथमेश परबने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मायबाप प्रेक्षकांपर्यंत…”
vivek oberoi reveals why he rejected om shanti om film
विवेक ओबेरॉयचा १७ वर्षांनी खुलासा; शाहरुखचा ‘ओम शांती ओम’ सिनेमा का नाकारला? म्हणाला, ” तेव्हा ४ ते ५ महिने…”
Radish leaves benefits reasons why radish leaves must not be thrown away
महिलांनो तुम्हीही मुळ्याची पानं टाकून देता का? थांबा! ‘हे’ ७ फायदे वाचून कळेल किती मोठी चूक करताय
Premachi Goshta Fame Actress Amruta Bane
सासरे असावेत तर असे! ‘प्रेमाची गोष्ट’ फेम अभिनेत्रीची सासरेबुवांसाठी खास पोस्ट; अभिनेता पती कमेंट करत म्हणाला…
badshah post on diljit dosanjh ap dhillon dispute
दिलजीत दोसांझ आणि एपी ढिल्लनच्या वादात बादशाहने घेतली उडी; पोस्ट शेअर करत म्हणाला, “आम्ही केलेल्या चुकांची…”

२. Maruti Suzuki Dzire: मारुती डिझायर एएमटी या कारवर ३२,००० रुपयांची सूट मिळत आहे. तर या कारच्या मॅन्युअल व्हेरिएंटवर १७,००० रुपयांची सूट मिळत आहे.

(हे ही वाचा : ५ लाखांपेक्षा कमी किमतीत करा खरेदी करा सिंगल चार्जवर २००km रेंज देणारी ‘ही’ इलेक्ट्रिक कार! )

३. 5th Generation Honda City: होंडा या कारवर ३०,००० रुपयांची रोख सवलत, २०,००० हजार रुपयांची एक्सचेंज डिस्काउंट, ७ हजार रुपयांचा Honda एक्सचेंज बोनस, ८,००० ची कॉर्पोरेट सूट आणि ३२,१४५ किमतीच्या विनामूल्य अॅक्सेसरीज त्याच्या पाचव्या पिढीतील सिटी कारच्या सर्व पेट्रोल प्रकारांवर देत आहे. या कारच्या खरेदीवर ग्राहक एकूण ७२,१४५ रुपयांपर्यंत बचत करू शकतात.

४. Honda WR-V: डिसेंबरमध्ये, WR-V चे सर्व पेट्रोल व्हेरिएंट ३०,००० रूपयांच्या रोख सवलतीसह, २०,००० रूपयांच्या एक्सचेंज डिस्काउंटसह, ७,००० रूपयांचा Honda एक्सचेंज बोनस, ५,000 रूपयांचा लॉयल्टी बोनस आणि ३५,३४० रूपयांच्या मोफत अॅक्सेसरीजसह उपलब्ध आहेत. या कारच्या खरेदीवर ग्राहक एकूण ७२,३४० रुपयांपर्यंत बचत होणार.

५. Honda Amaze: या डिसेंबरमध्ये, Honda कारवर १०,००० रूपयांची रोख सवलत, १०,००० रूपयांची एक्सचेंज सूट, ५,००० रूपयांचा लॉयल्टी बोनस, ६,००० रूपयांची कॉर्पोरेट सूट आणि १२,१४४ रूपयांच्या किमतीच्या विनामूल्य अॅक्सेसरीज देत आहे. या कारच्या खरेदीवर ग्राहक एकूण ४३,१४४ रुपयांपर्यंत बचत करता येणार आहे.

(हे ही वाचा : Flashback 2022: २०२२ मध्ये ‘या’ टॉप ५ MPV खरेदीसाठी तुटून पडले भारतीय; पाहा यादी! )

६. Honda Jazz: होंडा आपल्या कारवर १०,००० रूपयांची रोख सवलत, १०,००० रूपयांचे एक्सचेंज डिस्काउंट, ७,००० रूपयांचा होंडा एक्सचेंज बोनस आणि १२,०४७ रूपये किंमतीच्या जॅझ कारवर मोफत अॅक्सेसरीज देत आहे. या कारच्या खरेदीवर ग्राहक एकूण ३९,०४७ रुपयांपर्यंत बचत करता येणार आहे.

७. Maruti Celerio: मारुती सेलेरिओ कारच्या सीएनजी मॉडेलवर कंपनीने ४५,१०० रुपयांचा डिस्काउंट जाहीर केला असून या कारच्या पेट्रोल मॅन्युअल मॉडेलवर ३६,००० रुपयांची सूट मिळेल. तर सेलेरियोच्या एएमटी मॉडेलवर २१,००० रुपयांची बचत करता येईल.

८.Tata Harrier, Safari: या दोन्ही एसयूव्ही गाड्यांवर टाटा मोटर्सकडून ६५ हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट दिला जात आहे. यात पाच हजार रुपयांचं कॉर्पोरेट डिस्काउंट, काही मॉडेल्सवर ३० हजार रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट आणि ३० हजार रुपयांच्या एक्स्चेंज बोनसचा समावेश आहे.

(हे ही वाचा :Hero Bike: Royal Enfield ला टक्कर द्यायला आली Heroची सर्वात स्वस्त ‘ही’ बाईक; फीचर्स पाहून तुम्हीही म्हणाल… )

९. Maruti Suzuki Alto K10: मारुती सुझुकी या महिन्यात अल्टो K10 वर सर्वात मोठी सूट देत आहे. नवीन कार खरेदीदार मॅन्युअल व्हेरिएंट खरेदीवर ५२,००० रुपयांपर्यंत सूट घेऊ शकतात. तर, AMT व्हेरिएंटवर २२,००० रुपयांपर्यंतचे फायदे मिळतील. याशिवाय, CNG व्हर्जनवर ४५,१०० रुपयांपर्यंत बचत करण्याची संधी आहे.

१०. Renault Kwid: Renault च्या क्विड या कारवर ३५,००० रुपयांचा डिस्काउंट जाहीर करण्यात आला आहे. Renault Kwid १०,००० रूपये कॉर्पोरेट सवलत, १५,००० रूपयांचा एक्सचेंज ऑफर, १०,००० स्क्रॅप बेनिफिट आणि १०,००० रूपये रोख सूट यासह एकूण ४५,००० रुपयांच्या सवलतीच्या ऑफर मिळवत आहेत.

११. Maruti Suzuki Wagon R: वॅगन आर (मॅन्युअल) वर देखील ४२,००० रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. तर, AMT व्हेरिएंटवर २२,००० रुपयांपर्यंत सूट मिळेल. दुसरीकडे, जर तुम्हाला वॅगन आर CNG व्हेरिएंट घ्यायची असेल, तर तुम्ही २२,००० रुपयांपर्यंत सूट मिळवू शकता.

(हे ही वाचा : Cars Discounts Offers: आता होणार तुमची ६१ हजारांची बचत! ‘या’ जबरदस्त कारवर मिळत आहे बंपर डिस्काउंट )

१२. Renault Kiger: कायगर या कॉम्पॅक्ट एसयूव्हीवर ३५,००० रुपयांचा डिस्काउंट जाहीर करण्यात आला आहे. Renault या महिन्यात या कारवर १५,००० रूपये एक्सचेंज बोनस, १०,००० रूपये स्क्रॅपेज लाभ, १०,००० रूपये कॉर्पोरेट सवलत आणि दोन वर्षांची कारवर वॉरंटी सुद्धा देत आहे. या कारवर एकूण ४५,००० रूपयांची बचत केली जाऊ शकते.

१३. Maruti Suzuki Swift: मारुती सुझुकी स्विफ्ट या कारच्या सीएनजी व्हेरिएंटवर देखील १५,१०० रुपयांची ऑफर जाहीर करण्यात आली आहे. मारुती स्विफ्ट या कारची किंमत ५.७३ लाख रुपयांपासून सुरू होते. या कारवर ३२,००० रुपयांची बचत होईल.

१४. Renault Triber: या महिन्यात त्यांच्या Renault Triber कारवर २५,००० रूपयांचा एक्सचेंज बोनस, १०,००० रूपयांची कॉर्पोरेट सूट, १०,००० रूपयांचा स्क्रॅपेज लाभ आणि १५,००० रूपयांची रोख सवलत देत आहे. अशा प्रकारे, या कारच्या खरेदीवर एकूण ६०,००० रूपयांची बचत करता येणार आहे.

१५. Maruti S Presso: ही कार अवघ्या ४०,००० रुपयांच्या डाऊन पेमेंटवर खरेदी करता येणार असून यासाठी तुम्हाला ही एसयूव्ही कॅश पेमेंट मोडमध्ये खरेदी करण्यासाठी ६.६४ लाख रुपये मोजावे लागतील परंतु, तुम्ही प्लॅनद्वारे ४० हजार रुपये भरून ती खरेदी करू शकता. यासाठी दर महिन्याला ८,९८४ रुपयांचा ईएमआय भरावा लागेल.

Story img Loader