Maruti Suzuki Car Price Dropped: सणासुदीला अनेक लोक गाडी घ्यायच्या विचारात असतात. जर तुमचाही फोर व्हिलर घ्यायचा विचार सुरू असेल तर मारुती सुझुकीने तुमच्यासाठी आनंदाची बातमी आणली आहे.

‘या’ मॉडेल्सची किंमत होणार कमी

मारुती सुझुकी इंडिया (MSI) ने सोमवारी ऑटोमोबाईल उद्योगातील वाढत्या इन्व्हेंटरीच्या चिंतेमुळे आणि विक्रीत घसरण झाल्यामुळे दोन मॉडेल्सच्या निवडक व्हेरियंटच्या किमतीत कपात करण्याची घोषणा केली. Alto K10 आणि S-Presso या मॉडेलच्या किमती कमी होणार असल्याची माहिती ऑटो मेजरने २ सप्टेंबर रोजी एक्स्चेंजला दिली.

Petrol Diesel Price Today On 5th November
Petrol Diesel Price Today : आज पेट्रोल-डिझेल किती रुपयांनी झालं स्वस्त? तुमच्या शहरांतील इंधनाचा दर इथे चेक करा
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Rupee lowers as foreign investment returns to capital markets
रुपयाचा सार्वकालिक नीचांक; एक डॉलर आता ८४.११ रुपयांना
Oben Electric confirms Rorr EZ Launch Date
Oben Electric Rorr EZ : आता बदलतं तापमान सहन करणार तुमची इलेक्ट्रिक बाईक; ‘या’ दिवशी होणार लाँच, पाहा कसे असतील फीचर्स
Petrol And Diesel Rates In Marathi
Petrol Diesel Rates : महाराष्ट्रात कमी झाले का पेट्रोल-डिझेलचे दर? तुमच्या शहरांत काय आहे इंधनाची किंमत? जाणून घ्या
Should buy gold or diamond jewellery on Diwali
Money Mantra : दिवाळीत सोन्याचे की हिऱ्याचे दागिने घ्यावेत?
Aviation Turbine Fuel price
Aviation Turbine Fuel: विमान इंधन आणि वाणिज्य वापराचे सिलिंडर महाग
How many options are there to buy gold or jewellery for Diwali
Money Mantra : दिवाळीसाठी सोने वा दागिने घेण्याचे किती पर्याय आहेत?

“मारुती सुझुकीने अल्टो K10 आणि S-Presso च्या निवडक व्हेरियंटच्या किमती आजपासून म्हणजेच २ सप्टेंबर २०२४ पासून कमी करण्याची घोषणा केली आहे,” असं कंपनीने म्हटले.

हेही वाचा… Royal Enfield प्रेमींसाठी खुशखबर! तुमची आवडती Classic 350 नव्या लूकसह झाली लॉंच; किंमत एकदा पाहाच

S-Presso LXI Petrol या मॉडेलची मूळ किंमत ५.०१ लाख (एक्स-शोरूम) होती, जी आता २,००० रुपयांनी कमी करण्यात आली आहे. दरम्यान, Alto K10 VXI Petrol या मॉडेलची किंमत ६,५०० रुपयांनी कमी झाली आहे. Alto K10 रेंजची किंमत ३.९९ लाख आणि ५.९६ लाख रुपये आहे.

ऑगस्टमध्ये मारुती सुझुकीच्या विक्रीत ३.९% घट

मारुती सुझुकीने एकूण वाहन विक्रीत ३.९ टक्के घट नोंदवली असून ऑगस्ट २०२४ मध्ये १,८१,७८२ युनिट्सची विक्री झाली आहे. मागील वर्षी याच महिन्यात म्हणजे ऑगस्ट २०२३ मध्ये १,८९,०८२ युनिट्सची विक्री झाली होती. कंपनीच्या ऑगस्टमधील विक्रीत देशांतर्गत विकल्या गेलेल्या १,४५,५७० युनिट्स आणि निर्यात केलेल्या २६,००३ युनिट्सचा समावेश आहे.

मिनी आणि कॉम्पॅक्ट कार्सचा समावेश असणाऱ्या सेगमेंटमध्ये लक्षणीय घट झाल्यामुळे एकूण विक्रीत घसरण झाली आहे. ऑगस्ट २०२३ मध्ये विक्री ८४,६६० युनिट्स होती, ती ऑगस्ट २०२४ मध्ये १८.८५ टक्क्यांनी घसरून ६८,६९९ युनिट्सवर आली आहे.

हेही वाचा… ड्रम ब्रेक की डिस्क ब्रेक! कोणत्या ब्रेकची बाईक घेणे आहे योग्य? वाचा अन् गोंधळ दूर करा

ऑगस्टमध्ये कंपनीच्या देशांतर्गत विक्रीला मोठा फटका बसला, कारण मागील वर्षी याच महिन्यात म्हणजेच ऑगस्ट २०२३ मध्ये १,५६,११४ युनिट्सची विक्री झाली होती, ती आता ऑगस्ट २०२४ मध्ये ८.४ टक्क्यांनी घसरून १,४३,०७५ युनिट्सची विक्री झाली आहे.