Maruti Best Selling Car: मारुती सुझुकीचा बेस्ट सेलिंग कार्सच्या लिस्टमधील जलवा कायम आहे. या कारचा बेस्ट सेलिंग टॉप कारमध्ये समावेश आहे. बहुतांश कार कंपन्यांसाठी एप्रिल महिना फारसा चांगला गेला नाही. बऱ्याच काळानंतर कंपन्यांच्या कार विक्रीत वार्षिक आधारावर घट झाली आहे. पण तरीही देशात अशा काही गाड्या आहेत ज्यांची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जात आहे. एप्रिलमध्ये सर्वाधिक विक्री होणाऱ्या टॉप १० पैकी ६ कार मारुती सुझुकीच्या आहेत. वीस हजारांहून अधिक युनिट्सची विक्री करणाऱ्या मारुती सुझुकी वॅगनआरकडे सर्वोत्कृष्ट विक्री होणाऱ्या कारचे शीर्षक होते. दुसऱ्या क्रमांकावर मारुती सुझुकी स्विफ्ट आणि तिसऱ्या क्रमांकावर मारुती सुझुकी बलेनो आहे. दरम्यान, या कंपनीची एक कार देखील आहे ज्याने अतिशय वेगाने विक्री करून पुन्हा पहिल्या दहाच्या यादीत स्थान मिळवले आहे.

मारुती सुझुकीच्या ‘या’ कारचा बाजारपेठेत डंका

मारुति सुझुकीच्या गाड्यांना भारतात सर्वाधिक पसंती मिळते. बजेट कार आणि देशभरातील सर्व्हिस स्टेशनमुळे लोकं या गाड्या विकत घेतात. आम्ही ज्या कारबद्दल बोलत आहोत ती मारुती सुझुकी अल्टो आहे जी अजूनही ग्राहकांच्या पसंतीची कार आहे. मार्च महिन्यात जिथे या कारच्या विक्रीत घट झाल्यामुळे ती चौदाव्या क्रमांकावर पोहोचली होती, तर एप्रिलमध्ये परत येताना ती विक्रीच्या बाबतीत पुन्हा सातव्या क्रमांकावर आली आहे.

Germanys Warren Buffett Karl Hellerding
जर्मनीचा वॉरेन बफे : कार्ल हेलरडिंग
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
oil india limited portfolio
माझा पोर्टफोलियो : पोर्टफोलिओला महारत्नाची जोड
Matheran Mini Toy Train , Mini Train Vistadome Coach,
माथेरानच्या राणीचा ‘विस्टाडोम’विनाच प्रवास
india railway viral news Husband-Wife Fight
नवरा-बायकोतील भांडण अन् रेल्वेचे तीन कोटींचे नुकसान! OK मुळे चुकीच्या स्थानकावर पोहोचली ट्रेन; नेमकं घडलं काय? वाचा…
nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई
Husband picking up wife and play game see waht happend next funny video goes viral
“भावा बायकोला उचलून घ्यायचं म्हंजी खायचं काम नाय” ‘ही’ स्पर्धा पाहून पोट धरुन हसाल; VIDEO मध्ये पाहा शेवटी कोण जिंकलं
rbi digital awareness loksatta
जनजागृतीवर ५९ कोटींचा खर्च, तरीही सर्वसामान्यांच्या २,८८० कोटींवर डल्ला…बँकेत तुमचे पैसे…

(हे ही वाचा : Fortuner ही विसरुन जाल, देशात बोल्ड लुकसह नव्या अवतारात दाखल झाल्या दोन ७ सीटर SUV कार, किंमत…)

एप्रिल २०२३ च्या शेवटच्या महिन्यात मारुती सुझुकी अल्टोच्या ११,५४८ युनिट्सची विक्री झाली आहे. तर याच्या एक वर्ष आधी म्हणजेच एप्रिल २०२२ मध्ये १०,४४३ युनिट्सची विक्री झाली होती. अशाप्रकारे, अल्टोच्या विक्रीत १० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. दुसरीकडे, मार्चशी तुलना केल्यास, हे अंतर आणखी वाढते, कारण मार्चमध्ये केवळ ९,१३९ युनिट्सची विक्री झाली.

विक्री कमी होण्याचे कारण काय?

मारुती सुझुकी अल्टो आत्तापर्यंत फक्त दोन मॉडेल्समध्ये उपलब्ध होती, मारुती अल्टो 800 आणि मारुती अल्टो K10. पण कंपनीने आता Alto 800 बंद केली आहे. ते बंद होण्याचे मुख्य कारण म्हणजे BS6 फेज 2 उत्सर्जन नियम. त्यामुळे आता अल्टोच्या नावाने फक्त एकच मॉडेल शिल्लक आहे, ते म्हणजे अल्टो के १० आहे.