प्रत्येकाचं स्वप्न असतं, आपल्याजवळ एक सुंदर चकाकणारी कार हवी. सर्वप्रथम कार विकत घेताना २ गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. पहिली म्हणजे मायलेज आणि दुसरं म्हणजे कारचे फीचर्स. पण या दोन्ही गोष्टी एकत्र बघायला गेलं की, ती कार खूप महागडी असते, जी आपल्या बजेटच्या आवाक्या बाहेर जाते. कमी किंमत, उत्तम मायलेज आणि भन्नाट फीचर्स हाच हेतू कंपनीने साध्य करण्यासाठी एक हॅचबॅक सेगमेंटमधली दमदार कार लाँन्च केली आहे. कारच्या लाँन्चिंग पासून ते आतार्पंत ‘या’ हॅचबॅक कारने ग्राहकांना वेड लावलं आहे. आणखी काय आहे या कारमध्ये खास? जाणून घेऊया बातमीमध्ये…

कार एक, फिचर्स अनेक

ही कार कमी किंमत, उत्तम मायलेज आणि भन्नाट फिचर्समुळे आजही चर्चेत आहे. कंपनी कारमध्ये प्रीमियम फीचर्स देत आहे. कुठल्याही ट्रकवर गाडी चालवताना ती तुम्हाला कुठेही मागे ठेवणार नाही. हॅचबॅक सेगमेंटमध्ये येत, ही कार देशातील सर्वात मोठी ऑटोमोबाईल कंपनी मारुती सुझुकीने तयार केली आहे जी तिच्या विश्वसनीय कारसाठी ओळखली जाते. या कारचे नाव Alto K10 आहे. ही सर्वात स्वस्त हॅचबॅकपैकी एक, उत्कृष्ट K मालिका इंजिन मिळवते आणि कंपनी ते CNG पर्यायामध्ये देखील देते. त्याचबरोबर, ऑटोमॅटिक गिअरबॉक्स असलेली कारही तुम्ही खरेदी करू शकता.

silver truck mankhurd
मुंबई: मानखुर्द येथे चांदीचा ट्रक अडवला, ८० कोटींची आठ हजार ४७६ किलो वजनाची चांदी जप्त
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Toyota has launched the special edition versions For year end
Toyota Year End Deals : टोयोटाच्या तीन गाड्यांचे लिमिटेड एडिशन लाँच; कारच्या खरेदीवर मिळणार भरपूर अ‍ॅक्सेसरीज
passengers in E-Shivneri, E-Shivneri,
ई-शिवनेरीमध्ये अनधिकृतपणे प्रवासी बसवले
New Maruti Suzuki Dzire cheapest model price its features Engine and design
New Maruti Suzuki Dzire: मारुतीच्या नवीन डिझायरला मोठी पसंती, सगळ्यात स्वस्त मॉडेल घेण्यासाठी ग्राहकांची लागली रांग
rickshaw owners drivers Acche Din assembly election campaign
प्रचार मिरवणूकांमुळे रिक्षा चालकांना अच्छे दिन, तीन ते चार तासांसाठी रिक्षा चालकांना मिळतात ५०० ते १ हजार रुपये
Mumbai Vehicle Number Purchase, Vehicle Number,
मुंबई : पसंतीच्या वाहन क्रमांकांची खरेदी कमी; महसूल जास्त, दोन महिन्यांत १० कोटी रुपयांचा महसूल

(हे ही वाचा: कोणत्या एसयूव्ही कारच्या विक्रीतून सरकारच्या खात्यात होतात सर्वाधिक पैसे जमा? पाहा किती कर आकारला जातो? )

‘Alto K10’ मध्ये काय आहे खास?

Alto K10 मध्ये कंपनी १.० लीटर K सीरीज इंजिन देते. हे इंजिन पेट्रोलवर ६५ बीएचपी पॉवर जनरेट करते. तर सीएनजी व्हेरियंटमध्ये हे इंजिन ५५ बीएचपी पॉवर देते. कारच्या मायलेजबद्दल बोलायचे झाल्यास, ती पेट्रोलवर प्रति लिटर २५ किमी आणि सीएनजीवर ३६ किमी प्रति किलो मायलेज देते, जे या सेगमेंटमध्ये सर्वाधिक आहे. त्याचबरोबर, २ एअरबॅग्ज, ABS, EBD, रिअर पार्किंग सेन्सर, इन्फोटेनमेंट सिस्टम, सेंट्रल लॉकिंग, चाइल्ड लॉक, स्पीड सेन्सिंग डोअर लॉक, इंजिन इमोबिलायझर यांसारखी वैशिष्ट्ये मिळतात.

‘Alto K10’ ची किंमत किती ?

कारच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, ती ३.९९ लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध आहे. त्याचा टॉप व्हेरिएंट तुम्हाला ५.९६ लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध असेल. देखभालीच्या बाबतीतही अल्टो ही सर्वात किफायतशीर कार आहे. कारच्या देखभालीसाठी वर्षाला सुमारे ६,००० रुपये खर्च येतो. म्हणूनच की काय, ‘Alto K10’ आजही ग्राहकांची मनपसंत कार बनलेली आहे. कमी किंमत, उत्तम मायलेज आणि भन्नाट फिचर्स हा हेतू साध्य करण्यात कंपनीने मोठी मेहनत घेतली आहे.