Maruti Suzuki: स्वदेशी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी (Maruti Suzuki) सध्या भारतीय ऑटो बाजारात आपला पोर्टफोलिओ वाढविण्यात व्यस्त आहे. मारुती सुझुकीने पुन्हा एकदा भारतीय बाजारात धमाका केला आहे. मारुतीने आपली लोकप्रिय कार ‘Alto K10 चे नवीन CNG व्हेरियंट’ बाजारात लाँच केले आहे. कंपनीने अल्टो K10 मध्ये फिट केलेले सीएनजी किट जोडण्याव्यतिरिक्त कोणतेही मोठे बदल केलेले नाहीत. मारुति अल्टो गेल्या १६ वर्षांपासून देशातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारपैकी एक आहे आणि अल्टो K10 चे सीएनजी प्रकार आल्याने विक्रीत आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे, असे मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडचे ​​वरिष्ठ कार्यकारी अधिकारी शशांक श्रीवास्तव यांनी म्हटले आहे.

Maruti Suzuki Alto K10 CNG व्हेरियंटमध्ये काय असेल खास

Mercedes Benz India sales news in marathi
भारतात गाड्यांच्या विक्रीत दोन लाखांचा टप्पा; मर्सिडीज बेंझचा ‘आलिशान’ वरचष्मा कायम 
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
hero splendor plus price hike
देशात सर्वाधिक विक्री होणारी ‘ही’ बाईक आता महाग; जाणून घ्या नवी किंमत
New Car Launch Tata launches Tiago and Tigor in 2025
५ लाखांत टाटाने लाँच केली नवी कार! अपडेटेड Tiago आणि Tigor चे फीचर्स एकदा बघाच; थेट Marutiला देत आहे टक्कर
Mercedes Benz crosses 2 lakh car sales print eco news
‘मर्सिडीज बेंझ’कडून दोन लाख मोटारींची विक्री; ‘मर्सिडीज बेंझ’कडून दोन लाख मोटारींच्या विक्रीचा टप्पा सर
Transport Minister Pratap Sarnaik proposal regarding the cable car project Mumbai news
महानगर क्षेत्रात ‘केबल कार’ प्रकल्प उभारण्याची गरज; परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांचा प्रस्ताव
Amravati Shankarpata race at Bahiram organized by two leaders may spark political upheaval
बहिरम यात्रेत ‘बैलगाडा शर्यती’सोबतच राजकीय चढाओढ…
Mumbai first box of saffron mangoes of this season will be sold today
आंब्याची पहिली पेटी वाशी बाजारात जाणून घ्या, हंगामातील आवक कशी राहणार
  • नवीन Maruti Suzuki Alto K10 च्या CNG व्हेरियंटमध्ये देखील ग्राहकांना तब्बल ३३.८५ किलोमीटर प्रति किलोपर्यंत मायलेज मिळणार आहे. सीएनजी व्हेरियंटमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह २-DIN स्मार्टप्ले ऑडिओ सिस्टम, २ स्पीकर, इम्पॅक्ट सेन्सिंग डोअर अनलॉक, सेंट्रल लॉकिंग, स्पीड सेन्सिंग ऑटो डोअर लॉक, मॅन्युअल अॅडजस्टेबल विंग मिरर, AUX आणि USB पोर्ट, फ्रंट पॉवर वैशिष्ट्ये आहेत. मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडचे ​​वरिष्ठ कार्यकारी अधिकारी शशांक श्रीवास्तव म्हणाले की, कंपनीने आतापर्यंत १० लाखाहून अधिक S-CNG वाहनांची विक्री केली आहे.
  • Maruti Alto K10 मध्ये कंपनीने ७-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम दिली आहे, जी Apple कार प्ले आणि Android Auto ला सपोर्ट करते. याशिवाय कीलेस एंट्री, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल्स, मॅन्युअल अॅडजस्टेबल बाहेरील रियर व्ह्यू मिरर यांसारखी फीचर्स उपलब्ध आहेत. दुसरीकडे, सुरक्षेच्या दृष्टीने या कारला ड्युअल एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स डिस्ट्रिब्युशनसह अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, रिअर पार्किंग सेन्सर्स यांसारख्या सुविधा मिळतात.

(आणखी वाचा : देशातली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार फक्त २,००० रुपयांमध्ये बुक करण्यासाठी ‘या’ स्टेप्स फॉलो करा; सिंगल चार्जमध्ये 200km रेंज! )

Maruti Suzuki Alto K10 CNG व्हेरियंटचे फीचर्स

कंपनीने Alto K10 मध्ये कंपनी फिट केलेले CNG किट जोडण्याव्यतिरिक्त कोणतेही मोठे बदल केलेले नाहीत. ही कार नुकतीच लाँच करण्यात आली असल्याने तिला सर्व अत्याधुनिक फीचर्स मिळतात. या कारमध्ये कंपनीने १.० लिटर क्षमतेचे K10c Dualjet इंजिन VVT इंजिन वापरले आहे. जरी पेट्रोल मोडमध्ये हे इंजिन ६५ bhp ची शक्ती आणि ८९ Nm टॉर्क जनरेट करते, तर CNG मोडमध्ये त्याचे पॉवर आउटपुट ५५ bhp आणि ८२ Nm टॉर्क कमी होते.

Maruti Suzuki Alto K10 CNG व्हेरियंटची किंमत

कंपनीने Maruti Suzuki Alto K10 च्या CNG व्हेरियंटची प्रारंभिक किंमत ५.९५ लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) निश्चित केली आहे.

Story img Loader