Maruti Suzuki Alto K10 Updated Version Launched : देशातील आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी मारुती सुझुकीच्या गाड्यांची संख्या गेल्या काही वर्षांमध्ये लक्षणीयरीत्या कमी झाली असली तरी इंडो-जपानी कार निर्माता कंपनीने पहिल्यांदा कार खरेदी करणाऱ्यांसाठी परवडणाऱ्या एंट्री-लेव्हल कारची ऑफर सुरू ठेवली आहे. अल्टो के१० (Alto K10) ही सध्या भारतात विक्रीसाठी असलेली सर्वांत स्वस्त कार आहे आणि कंपनीने तिचे अपडेटेड व्हर्जन लाँच केले आहे.

अल्टो के१० ला दोन नवीन फीचर्स देण्यात आली आहेत. त्याशिवाय हे मॉडेल २०२४ मॉडेल सारखेच आहे. अल्टो के१० च्या सर्व व्हेरिएंटमध्ये आता सहा एअरबॅग्ज देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या कारच्या किमतीत १६ हजार रुपयांनी वाढ झाली आहे. त्यानुसार आता मारुती अल्टो के१० ची किंमत ४.२३ लाख रुपयांपासून ते ६.२१ लाख रुपयांपर्यंत (दोन्ही एक्स-शोरूम) असेल.

फीचर्स आणि स्पेक्स :

सहा एअरबॅग्जव्यतिरिक्त मागच्या प्रवाशांसाठी तीन पॉइंट सीट बेल्टही अपग्रेड करण्यात आले आहेत. ऑफरवरील इतर सुरक्षा फीचर्समध्ये इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्रॅम (ESP), रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स, EBD सह ABS आणि कोलॅप्सिबल स्टेअरिंग कॉलम यांचा समावेश आहे. त्याव्यतिरिक्त चाइल्ड सेफ्टी लॉक (rear door child lock) इंजिन इमोबिलायझर, हाय-स्पीड ॲलर्ट सिस्टम, फोर्स लिमिटरसह फ्रंट सीट बेल्ट प्रीटेन्शनर्स, बजरसह सीट बेल्ट रिमाइंडर, हेडलॅम्प लेव्हलिंग व हाय माऊंट स्टॉप लॅम्पसुद्धा देण्यात आला आहे.

अपग्रेड केलेल्या सुरक्षा उपकरणांव्यतिरिक्त मारुतीने अल्टो के१० चा म्युझिक सिस्टीमसुद्धा अपग्रेड केला आहे; ज्यामध्ये तुम्हाला आता दोनऐवजी चार स्पीकर्स दिले जातील. फीचर्स हायलाइट्समध्ये सात इंची टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टीम, कीलेस एंट्री, स्टेअरिंग-माउंटेड कंट्रोल्स, मॅन्युअली ॲडजस्टेबल बाहेरील रीअर व्ह्यु मिरर (ORVM) व सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर यांचा समावेश आहे.

मारुती अल्टो के१० ला पॉवरिंग एक लिटर नैसर्गिकरीत्या एस्पिरेटेड ड्युअलजेट पेट्रोल इंजिन आहे, जे ६७ bhp आणि ८९ Nm पीक टॉर्क जनरेट देते. हे इंजिन ५ स्पीड मॅन्युअल किंवा ५ स्पीड AMT सह जोडलेले आहे. त्याव्यतिरिक्त अल्टो के१० चे सीएनजी प्रकार समान इंजिनासह येतात, जे ५६ bhp आणि ८२ Nm टॉर्क जनरेट करते. CNG वेशात, Alto K10 केवळ ५ स्पीड मॅन्युअल ट्रान्स्मिशनसह जोडलेली आहे. CNG प्रकारांमध्ये idle इंजिन स्टार्ट / स्टॉप तंत्रज्ञानदेखील उपलब्ध आहे.

अल्टो के१०व्हेरिएंट आणि त्यांची किंमत

मारुती अल्टो व्हेरिएंट्सएक्स-शोरूम किंमतOld Ex-Showroom Price
ALTO K10 STD (O)४.२३ लाख रुपये४.०३ लाख रुपये
ALTO K10 LXI (O)५ लाख रुपये४.२३ लाख रुपये
ALTO K10 VXI (O)५.३१ लाख रुपये५.१५ लाख रुपये
ALTO K10 VXI+ (O)५.६० लाख रुपये५.५० लाख रुपये
ALTO K10 VXI (O) AGS५.८१ लाख रुपये५.६५ लाख रुपये
ALTO K10 LXI (O) CNG५.९० लाख रुपये५.८४लाख रुपये
ALTO K10 VXI+ (O) AGS६.१० लाख रुपये६.०० लाख रुपये
ALTO K10 VXI (O)६.२१ लाख रुपये६.०५ लाख रुपये

Story img Loader