Maruti Suzuki Car Price Hike: नवीन वर्षाच्या सुरुवातालीच मारुतीने ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. भारतातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी इंडियाने आज मंगळवारी म्हणजेच १६ जानेवारीला आपल्या सर्व मॉडेलच्या किमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे. आजपासून मारुती सुझुकीच्या सर्व वाहनांच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. कंपनीच्या सर्व मॉडेलची सरासरी किंमत ०.४५ टक्क्यांनी वाढली आहे, अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महागाई आणि कच्च्या मालाच्या वाढीव किमती, कार पार्ट्स महाग झाल्यामुळे वाहनांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मारुती कमी किमतीच्‍या छोट्या कार अल्‍टोपासून ते मल्‍टी-युटिलिटी व्‍हिकल इनव्हिक्‍टोपर्यंत अनेक वाहनांची विक्री करते. त्यांची किंमत ३.५४ लाख ते २८.४२ लाख रुपये (एक्स-शोरूम दिल्ली) दरम्यान आहे. आता या सर्व कारच्या दरात वाढ करण्यात आली आहे. गेल्या वर्षी १ एप्रिल रोजी कंपनीने आपल्या कारच्या किमती वाढवल्या होत्या. याआधी टाटा, टोयोटा आणि Volkswagen सारख्या कंपन्यांनीही त्यांच्या कारच्या किमती वाढवल्या आहेत.

(हे ही वाचा : मारुतीच्या ‘या’ ७ सीटर CNG कारसमोर सर्वांची बोलती बंद, 26kmpl पर्यंतचं मायलेज, किंमत फक्त… )

२०२३ मध्ये २ दशलक्ष कार विक्रीचा आकडा पार

मारुती कंपनीने २०२३ मध्ये प्रथमच दोन दशलक्ष युनिट्सचा वार्षिक विक्रीचा टप्पा ओलांडला. २०२३ मध्ये, कंपनीने २६९,०४६ युनिट्सची विक्री केली होती. २०२३ च्या शेवटच्या महिन्यात, कंपनीचे कार उत्पादन १२४,७२२ युनिट्सवरून सुमारे ३ टक्क्यांनी कमी होऊन १२१,०२८ युनिट्सवर आले होते. भारतीय कार मार्केटमध्‍ये जवळपास ५० टक्के कार मारुतीच्या आहेत आणि कमी किंमत आणि चांगले मायलेज यामुळे या कंपनीच्‍या कार भारतातील मध्यमवर्गीय कुटुंबांची पहिली पसंती ठरत आहेत.

टाटानेही आपल्या गाड्यांच्या किमती वाढवल्या

टाटा कंपनीनेही वर्षाच्या सुरुवातीला आपल्या गाड्यांच्या किमती ३ टक्क्यांनी वाढवल्या. जर आपण लक्झरी कार्सबद्दल बोललो, तर ऑडी, बीएमडब्ल्यू आणि मर्सिडीज-बेंझ सारख्या कंपन्यांनीही २०२४ मध्ये त्यांच्या किमती वाढवल्या आहेत. कोरोनानंतर भारतातील ऑटो मोबाईल मार्केटमध्ये घसरण झाली होती. आता २०२३ मध्ये पुन्हा कारच्या विक्रीत वाढ झाली होती, आता २०२४ मध्ये कारच्या किमती वाढल्यानंतर त्याचा कार बाजारावर किती परिणाम होतो, हे पाहावे लागेल.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maruti suzuki announced a price hike across models to the tune of 0 45 percent citing increased cost pdb