Best Selling Car: मारुती सुझुकीची प्रिमियम हॅचबॅक बलेनो ही गेल्या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारी २०२३ मध्ये देशातील सर्वाधिक विकली जाणारी कार बनली. मारुती नेक्सा बलेनो हॅचबॅक मागील फेब्रुवारीमध्ये टाटा नेक्सॉन आणि टाटा पंच तसेच ह्युंदाई क्रेटा सारख्या संबंधित सेगमेंटमध्ये सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारला मागे टाकण्यात अयशस्वी ठरली. गेल्या फेब्रुवारी १८,५९२ लोकांनी मारुती बलेनो हॅचबॅक खरेदी केली. अल्टोने गेल्या जानेवारीत बलेनोला मागे टाकले होते, पण बलेनोने पुन्हा आपला दर्जा दाखवला आणि देशवासीयांची आवडती कार बनली.
गेल्या महिन्यात ‘इतक्या’ लोकांनी खरेदी केली मारुती बलेनो
गेल्या महिन्यात म्हणजे फेब्रुवारी २०२३ मध्ये १८,५९२ ग्राहकांनी मारुती सुझुकी बलेनो खरेदी केली. तर, गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात केवळ १२,५७० युनिट्सची विक्री झाली होती. गेल्या वर्षीच्या फेब्रुवारीच्या तुलनेत यावर्षी फेब्रुवारीमध्ये बलेनोच्या विक्रीत ४८ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
Maruti Suzuki Swift दुसऱ्या क्रमांकावर
गेल्या महिन्यात मारुती सुझुकी स्विफ्ट ही दुसरी सर्वाधिक विक्री होणारी कार होती, जी १८,४१२ लोकांनी खरेदी केली होती. गेल्या वर्षीच्या फेब्रुवारीच्या तुलनेत यंदाच्या फेब्रुवारीमध्ये स्विफ्टच्या विक्रीत ४ टक्क्यांनी घट झाली आहे. गेल्या महिन्यात तिसरी सर्वाधिक विक्री होणारी कार मारुती सुझुकी अल्टो होती, जी १८,११४ ग्राहकांनी खरेदी केली होती.
(हे ही वाचा : …म्हणून तुमच्या नवीन कारची डिलिव्हरी वेळेवर झाली नाही; ‘या’ कंपनीच्या SUV साठी ग्राहक रांगेत )
WagonR चौथ्या क्रमांकावर
सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारच्या यादीत मारुती सुझुकी वॅगनआर चौथ्या क्रमांकावर पोहोचली आहे. गेल्या महिन्यात १६,८८९ ग्राहकांनी WagonR खरेदी केली होती. मारुती सुझुकी डिझायर पाचव्या क्रमांकावर होती, जी फेब्रुवारी २०२३ मध्ये १६,७९८ लोकांनी खरेदी केली होती.
टॉप 6 ते टॉप 10 गाड्या कोणत्या आहेत?
गेल्या महिन्यात भारतात सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारच्या यादीत मारुती सुझुकी ब्रेझा सहाव्या क्रमांकावर असून १५,७८७ मोटारींची विक्री झाली. यानंतर Tata Nexon ला १३,९१४ ग्राहकांनी खरेदी केले. मारुती सुझुकी Eeco आठव्या क्रमांकावर आहे आणि ती ११,३५२ लोकांनी खरेदी केली आहे. नववी बेस्ट सेलिंग कार टाटा पंच होती ११,१६९ लोकांनी त्यांचे आवडते म्हणून रेट केले होते. गेल्या महिन्यात दहावी सर्वाधिक विक्री होणारी कार Hyundai Creta होती, जी १०,४२१ ग्राहकांनी खरेदी केली होती.