भारतात अनेक वाहन उत्पादक कंपनी आहेत. ज्यामध्ये मारूती सुझुकी, ह्युंदाई, टाटा मोटर्स आणि अन्य कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी अनेक नवनवीन मॉडेल्स लॉन्च करत असतात. तसेच सर्व कंपन्यांनी मे २०२३ मधील आपल्या युनिट्सच्या विक्रीची आकडेवारी जाहीर केली आहे.

सर्व कंपन्यांनी आपली मे २०२३ मधील विक्रीची आकडेवारी जाहीर केली आहे. तर यामध्ये मारूती सुझुकीची Baleno ही कार मे २०२३ मध्ये भारतातील सर्वाधिक विक्री होणारी होणारी कार ठरली आहे. तर ह्युंदाईची Creta ही सर्वाधिक विक्री होणारी SUV कार ठरली आहे. मारूती सुझुकीच्या बलेनोची घाऊक विक्री ही १८,७३३ युनिट्स इतकी होती. तर क्रेटाची विक्री १४,४४९ युनिट्स इतकी होती. याबाबतचे वृत्त India Today ने दिले आहे.

Budget 2025 Prices of Electric vehicles to get cheaper
Budget 2025 : इलेक्ट्रिक वाहनांबाबत निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा! अर्थसंकल्पातील निर्णयामुळे सर्वसामान्यांना मिळणार ‘हे’ फायदे
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
car
Maruti Suzuki Price Hike: १ फेब्रुवारीपासून मारुती सुझुकीच्या कार महागणार! कोणत्या कारची किंमत किती वाढली आहे?
Kia Syros SUV price features
KIA च्या ‘या’ कारची लाँच आधीच बुकिंग सुरू; नेमकी इतकी मागणी का? फीचर्स काय आहेत, जाणून घ्या
What is best time to change car engine oil for maximum performance
कार घेतलीय पण ‘ही’ गोष्ट अजूनही माहित नाही! जाणून घ्या, गाडीचे ‘इंजिन ऑइल’ किती दिवसांनी बदलावे…
Shark Tank Season 4 judges are well known in the country and here are the cars they own
BMW ते Mercedes-Benz पर्यंत… शार्क टँकचे १० शार्क्स या आलिशान कारचे आहेत शौकीन? वाचा कोणाकडे आहे कोणती कार?
Maruti Suzuki car price loksatta news,
‘या’ कार कंपनीकडून वाहनांच्या किमतीत मोठी वाढ
Komaki SE series electric scooters
Komaki SE series: सिंगल चार्जवर १२० किलोमीटरपर्यंतची रेंज; सुरक्षेसाठी ‘हे’ फीचर; भारतात लाँच झाली इलेक्ट्रिक स्कूटर

हेही वाचा : Maruti ची सगळ्यात प्रीमियम कार अवघ्या काही दिवसात बाजारात, लवकरच बुकिंगला होणार सुरूवात

बलेनो जी प्रीमियम हॅचबॅक सेगमेंटमध्ये अग्रस्थानी आहे. ज्याची किंमत ६.६१ लाख ते ९.८८ लाख (एक्स-शोरूम) रुपयांदरम्यान आहे. मारूती सुझुकीच्या बलेनोला १.२ लिटर ड्युअल जेट VVT चे पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. जे ८९.७३ PS बीएचपी आणि ११३ एनएम टॉर्क जनरेट करते. हे इंजिन ५-स्पीड AMT किंवा ५-स्पीड MT सह जोडले जाऊ शकतो. ५-स्पीड MT सह एक CNG पर्याय पण मिळतो.

मारूती सुझुकी बलेनो आणि ह्युंदाई क्रेटा (Image Credit- Loksatta Graphics Team)

ह्युंदाई Creta जी मध्यम आकाराच्या SUV सेगमेंटमध्ये येते. त्याची किंमत १०.८७ लाख रुपये ते १९.२० लाख (एक्स-शोरूम) रुपयांमध्ये आहे. ह्युंदाई क्रेटा एसयूव्ही ग्रँड विटारा, टोयोटा अर्बन क्रुझर हायरायडर आणि स्कोडा Kushaq व फॉक्सवॅगन Taigun यांच्याशी स्पर्धा करते. सध्या क्रेटामध्ये १.५ लिटरचे MPi चे पेट्रोल इंजिन मिळते. जे ११५ PS आणि १४३.८ एनएम टॉर्क जनरेट करते. तसेच १.५ लिटरचे U2 CRDi डिझेल इंजिनचा दुसरा पर्याय मिळतो. हे डिझेल इंजिन ११६ PS आणि २५० एनएम टॉर्क जनरेट करते. पेट्रोल इंजिनला ६-स्पीड MT किंवा IVT आहे जोडलेले आहे. तर डिझेल इंजिन ६-स्पीड MT आणि ६-स्पीड AT असे दोन पर्याय मिळतात.

हेही वाचा : Two-Wheeler Sales May 2023: मे महिन्यात दुचाकींच्या विक्रीत विक्रमी वाढ; ‘ही’ कंपनी आहे पहिल्या क्रमांकावर, जाणून घ्या

मे २०२३ मधील टॉप १० कार्स

मारूती सुझुकी Baleno – १८,७३३ युनिट्स
मारूती सुझुकी Swift – १७,३४६ युनिट्स
मारूती सुझुकी WagonR – १६,२५८ युनिट्स
मारूती सुझुकी Brezza – १३,९९८ युनिट्स
मारूती सुझुकी Eeco – १२,८१८ युनिट्स
मारूती सुझुकी Dzire – ११,३१५ युनिट्स
ह्युंदाई Creta – १४,४४९ युनिट्स
टाटा Nexon- १४,४२३ युनिट्स
टाटा Punch -११,१२४ युनिट्स
मारूती सुझुकी Ertiga – १०,५२८ युनिट्स

Story img Loader