Maruti Suzuki Baleno range: मारुती सुझुकी बलेनोचा इंडियन मार्केटमध्ये चांगलाच दबदबा आहे. तसेच प्रीमियम हॅचबॅक सेगमेंटमध्ये या कारची चांगलीच मागणी आहे. २०२५ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या १० महिन्यांत लोकांनी ही कार मोठ्या संख्येने खरेदी केली आहे. एप्रिल २०२४ ते जानेवारी २०२५ या १० महिन्यांत, या कारचे एकूण १,३९,३२ युनिट्स सेल झाले.देशातील प्रीमियम हॅचबॅक सेगमेंटमध्ये वर्षानुवर्षे मारुती बलेनोचा चांगलाच दबदबा आहे. या सेगमेंटमध्ये बलेनो टाटा अल्ट्रोज, टोयोटा ग्लांझा आणि ह्युंदाई १२० शी स्पर्धा करते. गेल्या महिन्यात ही कार विक्रीत पुन्हा एकदा नंबर १ राहिली आहे.. गेल्या महिन्यात देशातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या टॉप १० कारमध्ये बलेनो पाचव्या क्रमांकावर होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२०२५ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या १० महिन्यांत लोकांनी ही कार मोठ्या संख्येने खरेदी केली आहे. एप्रिल २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या ११ महिन्यांत, याचे १,५४,८०४ युनिट्स विकले गेले. या ११ महिन्यांत, बलेनोने महिंद्रा स्कॉर्पिओ, मारुती डिझायर, टाटा नेक्सॉन, मारुती फ्रॉन्क्स, ह्युंदाई व्हेन्यू यांसारख्या मॉडेल्सनाही मागे टाकले आहे.

बलेनो या सेगमेंटमध्ये टाटा अल्ट्रोझ, टोयोटा ग्लांझा आणि ह्युंदाई i 20 शी स्पर्धा करते. या कारची एक्स-शोरूम किंमत ६.७० लाख रुपये आहे. १० महिन्यांत, या गाडीने महिंद्रा स्कॉर्पिओ, मारुती डिझायर, टाटा नेक्सॉन, मारुती फ्रॉन्क्स, ह्युंदाई व्हेन्यू यांसारख्या मॉडेल्सनाही मागे टाकले आहे.

बलेनो सेफ्टी फीचर्स आणि किंमत

सेफ्टीसाठी, मारुती बलेनोमध्ये ६ एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम (ESP), हिल-स्टार्ट असिस्ट, ३६० -डिग्री कॅमेरा, EBD सह ABS, ISOFIX चाइल्ड सीट अँकरेज, रिव्हर्सिंग कॅमेरा आणि रिअर पार्किंग सेन्सर सारख्या फीचर्सचा समावेश आहे. बलेनो ४ व्हेरिएंटमध्ये विकली जाते – सिग्मा, डेल्टा, झेटा आणि अल्फा.

बलेनोची फीचर्स आणि डिटेल्स

बलेनोमध्ये १.२ लिटर, ४-सिलेंडर K12N पेट्रोल इंजिन आहे. जे ८३ बीएचपीची पॉवर जनरेट करते. तसेच १.२-लिटर ड्युअलजेट पेट्रोल इंजिन 90bhp पॉवर जनरेट करते. यात मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन ऑप्शन आहेत. बलेनो सीएनजी १.२-लिटर ड्युअल जेट पेट्रोल इंजिनने सुसज्ज आहे जे ७८ पीएस पॉवर आणि ९९ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. मारुती बलेनोची एमटी व्हर्जन प्रति लिटर २२.३५ किलोमीटर मायलेज देते आणि एएमटी व्हर्जन प्रति लिटर २२.९४ किलोमीटर मायलेज देते.