देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी इंडियाने गुरुवारी जाहीर केलं की, प्रीमियम हॅचबॅक बलेनोचे आतापर्यंत १० लाख युनिट विकले गेले आहे. ऑक्टोबर २०१५ मध्ये सादर केलेले मॉडेल कंपनीच्या प्रीमियम रिटेल चेन नेक्साद्वारे विकले गेले आहेत. नोव्हेंबर २०१८ मध्ये एकूण ५ लाख युनिट्सची विक्री झाली होती. या वर्षी नोव्हेंबरमध्ये १० लाख युनिट्सचा टप्पा ओलांडला आहे. कंपनीचे वरिष्ठ कार्यकारी संचालक (मार्केटिंग आणि विक्री) शशांक श्रीवास्तव म्हणाले की, “लाँच झाल्यापासून, बलेनो प्रीमियम हॅचबॅक सेगमेंटमध्ये आघाडीवर आहे आणि तिने २५ टक्क्यांहून अधिक मार्केट शेअर मिळवला आहे. हे मॉडेल भविष्यात नवीन उंची गाठेल.” बलेनो कार १.२ लिटर पेट्रोल इंजिनने समर्थित असून ग्राहकांना सुझुकीच्या स्मार्ट हायब्रिड तंत्रज्ञानाचा पर्याय देते. देशातील २४८ शहरांमध्ये असलेल्या नेक्साच्या ३९९ आउटलेट्सद्वारे गाडी विकली जाते.

मारुती कारने विक्रीच्या बाबतीत ठसा उमटवला असेल, परंतु या मेड इन इंडिया वाहनाला लॅटिन NCAP क्रॅश चाचणीत शून्य स्टार रेटिंग मिळाले आहे. अलीकडच्या काळात जागतिक क्रॅश चाचणीत अपयशी ठरणारी ही दुसरी भारतात बनवलेली मारुती सुझुकी कार आहे. या प्रीमियम हॅचबॅकच्या आधी, स्विफ्टला ऑगस्ट २०२१ मध्ये शून्य स्टार रेटिंग मिळाले होते. प्रौढांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत, बलेनोने लॅटिन NCAP मध्ये २०.०३ टक्के, मुलांच्या सुरक्षेत १७.०६ टक्के, पादचारी सुरक्षा आणि असुरक्षित रस्ता वापरकर्त्यांसाठी ६४.०६ टक्के आणि सुरक्षा सहाय्यामध्ये ६.९८ टक्के गुण मिळवले. असं असलं तरी स्विफ्ट आणि बलेनो या दोन्ही गाड्यांची भारतात सर्वाधिक विक्री आहे.

EMI प्लॅनसह फक्त २१ हजार भरून Royal Enfield Meteor 350 क्रूजर बाइक घेऊन जा; जाणून घ्या संपूर्ण माहिती

ह्युंदई i20 आणि टाटा Altroz ​​सारखी वाहने बाजारात आल्यापासून, मारुती नवीन पिढीतील Baleno लाँच करण्याच्या तयारीत आहे. नवं मॉडेल नवीन वर्षात येणार असल्याचे बोलले जात आहे. नवं मारुती बलेनो मॉडेल पूर्वीपेक्षा आकाराने मोठी असू शकते. स्पेससोबतच त्यात आणखी फिचर्स असतील, असं सांगण्यात येत आहे.