सध्या देशभरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहनांची खरेदी वाढली आहे. अनेक कंपन्या आपले नवीन मॉडेल्स बाजारात सादर करत असतात.. त्यामध्ये सध्या सीएनजी गाड्या खरेदी करण्याकडे लोकांचा भर दिसून येत आहे. यामध्ये मारुती सुझुकीकडे देशांतर्गत बाजारपेठेमध्ये सर्वाधिक सीएनजी वाहने आहेत. त्यामध्ये आणखी एक नाव सामील होणार आहे. कंपनीने ही कार जानेवारी २०२३ मध्ये ऑटो एक्सपोमध्ये लॉन्च केली आहे. ही कार कोणती आहे आणि त्याचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन जाणून घेऊयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मारुती सुझुकीने ऑटो एक्स्पो २०२३ मध्ये ब्रेझा मॉडेल सादर केले होते. आता कंपनी ब्रेझाच्या सीएनजी मॉडेलचे बुकिंग सुरु केले आहे. हे मॉडेल कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून किंवा अधिकृत डिलरशिपद्वारे बुकिंग केले जाऊ शकते. ब्रेझाच्या नवीन मॉडेलला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. त्याचबरोबर या कारला टक्कर देणाऱ्या कारमध्ये टाटा, ह्युंदाई आणि महिंद्रा या गाड्यांचा समावेश आहे.

हेही वाचा : Google कडून मोठी घोषणा! आता ‘या’ अ‍ॅप्ससाठी करता येणार नवीन AI फीचर्सचा वापर

मारुतीने सुझुकीने ऑक्टोबरमध्येच ब्रेझाच्या सीएनजी मॉडेलला वेबसाईटवर लिस्ट केले होते. या मॉडेलचे बुकिंग सुरु झाल्यामुळे हे मॉडेल लवकरच लॉन्च होण्याची शक्यता आहे. कंपनी ही कार मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह चार प्रकारांमध्ये लॉन्च करू शकते. ब्रेझामध्ये CNG LXI 5MT, CNG VXI 5MT/6AT, CNG ZXI 5MT/6AT आणि CNG ZXI+ 5MT/6AT या चार प्रकारांमध्ये सादर केले जाऊ शकते. तर यामध्ये मॅन्युअलमध्ये ५ आणि ऑटोमेटिकमध्ये ६ गिअर मिळू शकतात.

फीचर्स

Brezza 2022 मधील K15C स्मार्ट हायब्रिड १.५ पेट्रोल इंजिन ६००० आरपीएम वर १०२ एचपी कमाल पॉवर आणि ४४०० आरपीएम वर १३७ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. मात्र त्याच्या पेट्रोल प्रकाराच्या तुलनेत पॉवर ट्रेनमध्ये काही कमतरता असू शकते. Maruti Brezza CNG मध्ये फॅक्टरी फिटेड CNG किटसह १.५ लिटर पेट्रोल इंजिन मिळणार आहे. हे इंजिन ८८ पीएस पॉवर आणि १२१.५ एनएम टॉर्क जनरेट करते. Brezza CNG आधीच्या मॉडेलपेक्षा जास्त मायलेज देईल असा कंपनीचा दावा आहे. सीएनजी मॉडेल २७ किमी इतके मायलेज देईल. ब्रेझाचे पेट्रोल मॉडेल हे ऑटोमॅटिक गिअरबॉक्समध्येयें १९.८० आणि मॅन्युअल गिअरबॉक्समध्ये २०. १५ किमी इतके मायलेज देते. मारुती सुझुकीच्या या नवीन सीएनजी मॉडेलची किंमत अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maruti suzuki booking start for breeza cng model with attractive features tmb 01