Maruti Suzuki breaks records in FY25: मार्च महिन्यात देशात प्रवासी वाहनांची तुफान विक्री झाली आहे. या यादीत हॅचबॅक कार्सचा नेहमीप्रमाणे दबदबा पाहायला मिळाला. देशात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या हॅचबॅक कार्सची यादी पाहिल्यास मारुती सुझुकीचा बाजारावरील वरचष्मा पाहायला मिळेल. मारुतीच्या कार्सची मोठी मागणी असल्याचे पाहायला मिळाले आहे. कार क्षेत्रात सर्वाधिक मागणी कमी बजेटच्या हॅचबॅक कारची आहे, ज्यांना त्यांच्या किफायतशीर मायलेजसाठी प्राधान्य दिले जाते. या सेगमेंटमधील कमी बजेटच्या गाड्यांपैकी, आम्ही मारुतीच्या कारबद्दल बोलत आहोत. या कारला किंमत आणि मायलेज व्यतिरिक्त बूट स्पेस आणि केबिन स्पेससाठी प्राधान्य दिले जात आहे.
जेव्हा जेव्हा मध्यमवर्गीय कुटुंबासाठी कार खरेदी करण्याची चर्चा होते, तेव्हा मारुती सुझुकीचे नाव पुढे येते आणि या कंपनीचे नाव आल्यावर सर्वात पहिले नाव मनात येते ते म्हणजे दोन दशकांहून अधिक काळ लोकांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या मारुतीच्या स्वस्त कारचे. आता मारुतीच्या एका कारने ग्राहकांच्या मनावर आपले राज्य केले आहे. विक्रीच्या बाबतीत या कारने टाटा पंचलासुद्धा मागे टाकले आहे.
भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा शेवट एका शानदार विक्रमासह केला आहे. कंपनीने मार्चमध्ये आतापर्यंतची सर्वाधिक विक्री नोंदवली आहे, ज्यामध्ये एकूण २२ लाख ३४ हजार २६६ वाहने आहेत. त्याच वेळी, गेल्या आर्थिक वर्षात २०२३-२४ मध्ये मारुतीने २१ लाख ३५ हजार ३२३ वाहनांची विक्री केली होती. या विक्रीसह, कंपनीच्या लोकप्रिय हॅचबॅक वॅगनआरने २०२२ पासून सलग चौथ्यांदा भारतात सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारचा किताब जिंकला आहे.
टाटा पंचला टाकलं मागे
यावेळी वॅगनआरने विक्रीच्या बाबतीत टाटा पंचला मागे टाकत पहिले स्थान पटकावले आहे. काही महिन्यांपूर्वी टाटा पंच लाँच झाल्यापासून, या कारची विक्री बाजारात जोरदार होत असल्याचे दिसत होते. तथापि, या वर्षीच्या विक्री अहवालात वॅगनआरने १.९८ लाख कार्सची विक्री नोंदवित आघाडी घेतली आहे आणि पंचने १.९६ लाख कार्सची विक्री केली आहे. या यादीत ह्युंदाई क्रेटा १.९४ लाख कार्सच्या विक्रीसह तिसऱ्या स्थानावर आहे.
मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड (MSIL)ने आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये वॅगनआर ही भारतातील सर्वाधिक विक्री होणारी कार म्हणून घोषित केली आहे. या वर्षी वॅगनआरच्या १,९८,४५१ कार्सची विक्री झाली आहे. मारुती सुझुकी वॅगनआरने सलग चौथ्या वर्षी ३३.७ लाख ग्राहकांसह भारतातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारचा किताब कायम ठेवला आहे.