Best Selling SUV: भारतीय वाहन बाजारात एसयूव्हींना मोठी मागणी आहे. टाटा मोटर्सपासून ते मारुती सुझुकी आणि ह्युंदाईसारख्या कंपन्यांमध्ये या सेगमेंटमध्ये चढाओढ पाहायला मिळत आहे. तसेच महिंद्रा आणि महिंद्रा कंपनी देखील या सेगमेंटमध्ये दमदार कामगिरी करत आहे. टाटा नेक्सॉन ही कार गेल्या अनेक महिन्यांपासून देशातली बेस्ट सेलिंग एसयूव्ही ठरत आहे. परंतु मार्च २०२३ मध्ये मारुतीच्या एका कारने मोठा उलटफेर केला आहे.
मार्च २०२३ मधील बेस्ट सेलिंग कारबद्दल बोलायचं झाल्यास मारुती सुझुकी स्विफ्ट या कारने तो बहुमान पटकावला आहे. कंपनीने गेल्या महिन्यात या कारच्या १७ हजारांहून अधिक युनिट्सची विक्री केली आहे. तर एसयूव्हींच्या सेगमेंटमध्ये देखील मारुतीच्या कारचा वरचष्मा पाहायला मिळाला. मारुती सुझुकी ब्रेझा ही देशातली बेस्ट सेलिंग एसयूव्ही ठरली आहे. कंपनीने गेल्या महिन्यात या कारच्या १६,२२७ युनिट्सची विक्री केली आहे. ही देशातली दुसरी सर्वाधिक विकली जाणारी प्रवासी कार आहे.
नेक्सॉनची दुसऱ्या स्थानी घसरण
सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या एसयूव्हींच्य यादीत टाटा नेक्सॉन कारने दुसरा नंबर पटकावला आहे. टाटा मोटर्सने गेल्या महिन्यात नेक्सॉनच्या १४,७६९ युनिट्सची विक्री केली आहे. ही देशातली पाचवी सर्वाधिक विकली जाणारी प्रवासी कार आहे. टाटा मोटर्स कंपनी दर महिन्याला या कारच्या सरासरी १४ हजार ते १५ हजार युनिट्सची विक्री करते.
हे ही वाचा >> कार, बसमधून प्रवास करताना तुम्हालाही उलट्या होतात का? करा ‘हे’ सोपे उपाय, प्रवास होईल आनंदात
एसयूव्हींच्या सेगमेंटमध्ये तिसरा क्रमांक ह्युंदाई क्रेटाने पटकावला आहे. ह्युंदाने गेल्या महिन्यात या कारच्या १४,०२६ युनिट्सची विक्री केली आहे.