Maruti Brezza CNG All Variants Finance Details: भारतात सध्या सीएनजी एसयूव्ही कार्सची मागणी झपाट्याने वाढत आहे. या कार्समध्ये सध्या मारुती सुझुकीच्या ब्रेझा सीएनजी कारला चांगलीच पसंती मिळतेय. म्हणूनच गेल्या ऑगस्टमध्ये मारुती सुझुकीची ब्रेझा ही सर्वाधिक विक्री होणारी कार होती. चांगला लूक, जबरदस्त मायलेज आणि इतर फीचर्समुळे मारुती सुझुकी ब्रेझा सीएनजी कार केवळ इतर कॉम्पॅक्ट एसयूव्हीसाठीच नव्हे, तर हॅचबॅकसाठीही मोठे आव्हान आहे.

ही कार भविष्यात टाटा नेक्सॉन सीएनजीला टक्कर देईल. सध्या Brezza CNG चे सर्व LXI, VXI, ZXI व ZXI DT असे चार व्हेरिएंट आहेत. या चारही व्हेरिएंटची ऑन-रोड किंमत, तसेच लोन, EMI, डाउन पेमेंट व व्याजदर याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ..

17th November Latest Petrol Diesel Price
Petrol Diesel Price In Maharashtra : कुठे स्वस्त तर कुठे महाग, तुमच्या शहरांतील १ लिटर पेट्रोल-डिझेलची किंमत जाणून घ्या
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
silver truck mankhurd
मुंबई: मानखुर्द येथे चांदीचा ट्रक अडवला, ८० कोटींची आठ हजार ४७६ किलो वजनाची चांदी जप्त
Toyota has launched the special edition versions For year end
Toyota Year End Deals : टोयोटाच्या तीन गाड्यांचे लिमिटेड एडिशन लाँच; कारच्या खरेदीवर मिळणार भरपूर अ‍ॅक्सेसरीज
New Maruti Suzuki Dzire cheapest model price its features Engine and design
New Maruti Suzuki Dzire: मारुतीच्या नवीन डिझायरला मोठी पसंती, सगळ्यात स्वस्त मॉडेल घेण्यासाठी ग्राहकांची लागली रांग
Gold prices at lows Big fall after Diwali
सुवर्णवार्ता… सोन्याचे दर निच्चांकीवर… दिवाळीनंतर मोठी घसरण…
Mumbai Vehicle Number Purchase, Vehicle Number,
मुंबई : पसंतीच्या वाहन क्रमांकांची खरेदी कमी; महसूल जास्त, दोन महिन्यांत १० कोटी रुपयांचा महसूल

मारुती सुझुकी ब्रेझा LXI CNG

Maruti Suzuki Brezza CNG च्या बेस व्हेरिएंट Brezza LXI CNG ची एक्स-शोरूम किंमत ९.२९ लाख रुपये आहे आणि ऑन-रोड किंमत १०.३७ लाख रुपये आहे. जर तुम्ही ही कार दोन लाख रुपयांच्या डाउन पेमेंटसह खरेदी करीत असाल, तर तुम्हाला ८.३७ लाख रुपयांचे कर्ज मिळू शकेल. जर कर्जाचा कालावधी पाच वर्षांसाठी असेल, तर त्यावर नऊ टक्के व्याजदर असेल. त्यात तुम्हाला पुढील पाच वर्षांसाठी दरमहा १७,३७५ रुपये EMI भरावा लागेल. Brezza LXI CNG वर तुम्हाला २.०५ लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज भरावे लागू शकते.

मारुती सुझुकी ब्रेझा VXI CNG

Maruti Suzuki Brezza VXI CNG ची एक्स-शोरूम किंमत १०.६४ लाख रुपये आणि ऑन-रोड किंमत १२.२७ लाख रुपये आहे. जर तुम्ही ही कार दोन लाख रुपयांचे डाऊन पेमेंट करून खरेदी केली, तर तुम्हाला १०.२७ लाख रुपयांचे कर्ज घ्यावे लागेल. तुम्ही पाच वर्षांच्या कालावधीसाठी नऊ टक्के व्याजदराने कर्ज घेतल्यास दर महिना तुम्हाला २०,९०४ रुपये भरावे लागतील. अशा प्रकारे तुम्हाला Brezza VXI CNG वर २.४७ लाख व्याज भरावे लागेल.

मारुती सुझुकी ब्रेझा ZXI CNG

Maruti Suzuki Brezza ZXI CNG मॉडेलची एक्स-शोरूम किंमत १२.१० लाख रुपये आहे आणि ऑन-रोड किंमत १३.९२ लाख रुपये आहे. जर तुम्ही ब्रेझा सीएनजीची ही कार दोन लाख रुपयांच्या डाउन पेमेंटसह खरेदी करायची असेल, तर तुम्हाला पाच वर्षांसाठी नऊ टक्के व्याजदराने ११.९२ लाख रुपयांचे कर्ज मिळू शकते. ????तुम्हाला यात पुढील ६० महिन्यांपर्यंत २४,७४४ ही कर्जाची रक्कम भरावी लागेल. यावर तुमच्याकडून २.९२ लाख व्याज आकारले जाईल.???

मारुती सुझुकी ब्रेझा ZXI CNG DT

मारुती सुझुकी ब्रेझाच्या टॉप सीएनजी व्हेरिएंटमध्ये ZXI CNG DT ही कार येते. या कारची एक्स-शोरूम किंमत १२.२६ लाख रुपये आहे आणि ऑन-रोड किंमत १४.१० लाख रुपये आहे. तुम्ही ही कार दोन लाख रुपयांच्या डाउन पेमेंटसह खरेदी केल्यास तुम्हाला १२.१० लाख रुपयांचे कर्ज मिळेल. या कर्जाचा कालावधी पाच वर्षांपर्यंत असेल आणि व्याजदर नऊ टक्के असेल. तुम्हाला मासिक हप्ता म्हणून २५,११८ रुपये भरावे लागतील. Brezza CNG टॉप व्हेरियंटवर तुम्हाला २.९७ लाख रुपये व्याज द्यावे लागेल.

हेही वाचा – आता २० किमीपर्यंत चालवा टेन्शन फ्री गाडी,भरावा लागणार नाही एक रुपयाही टोल; पण सरकारने ठेवली ‘ही’ अट

यात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कर्ज घेऊन Brezza CNG खरेदी करण्यापूर्वी जवळच्या मारुती सुझुकी एरिना शोरूममध्ये जा आणि तिथे फायनान्स डिटेल्स एकदा चेक करा.