Maruti Suzuki Brezza: देशातील सर्वात मोठी कार विकणारी कंपनी मारुती सुझुकीने त्यांच्या ब्रेझाच्या किमतीत वाढ केली आहे. तथापि, या वाढीव किमतीचा फायदा फक्त ग्राहकांनाच होईल असे कंपनीचे म्हणणे आहे. खरंतर, मारुतीने त्यांच्या ब्रेझामध्ये अनेक नवीन सेफ्टी फीचर्स समाविष्ट केले आहेत, ज्यामुळे या कारची किंमत वाढली आहे. कंपनी या कारमध्ये ६ एअरबॅग्ज अॅड करत आहे.
काय आहेत सेफ्टी फीचर्स
मारुती सुझुकीच्या ब्रेझामध्ये ६ एअरबॅग्जसह ३ पॉइंट ईएलआर रिअर सेंटर सीट बेल्ट, हाय अॅडजस्टेबल सीट बेल्ट, कप होल्डर्स आणि रिअर सेंटर आर्मरेस्ट सारखे फीचर्स आहेत. कंपनी कारच्या स्टॅंडर्ड मॉडेलमध्ये या सर्व फीचर्स समावेश करत आहे.
आधीची आणि आताची किंमत
यापूर्वी मारुती ब्रेझाची सुरुवातीची किंमत ८.५४ लाख रुपये एक्स-शोरूम होती, जी आता ८.६९ लाख रुपये एक्स-शोरूम करण्यात आली आहे, परंतु ही किंमत केवळ सेफ्टी फीचर्समुळे वाढली आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, कारच्या बेस मॉडेल LXi ट्रिमची किंमत सुमारे १५,००० रुपयांनी वाढली आहे. तर VXI ची किंमत ५,५०० रुपयांनी आणि ZXI ची किंमत ११,५०० रुपयांनी वाढवण्यात आली आहे.
![](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/maruti-suzuki-brezza.png?w=819)
इंजिन
मारुतीच्या या ५ सीटर कारमध्ये १.५ लिटरचे नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन वापरले गेले आहे. जे ६,००० आरपीएम वर १०२ बीएचपी पॉवर आणि ४,४०० आरपीएम वर १३६.८ एनएम टॉर्क निर्माण करते. या कारमध्ये ५-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि ६-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय आहे.
![](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/image_269441.png?w=830)
अशा परिस्थितीत, जर तुम्ही मारुतीकडून सुरक्षित कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर मारुती ब्रेझा हा एक सर्वोत्तम पर्याय असू शकतो, ज्यामध्ये तुम्हाला कमी किमतीत चांगल्या फीचर्ससह फॅमिली कार मिळू शकते.