Maruti Suzuki Brezza Becomes Best Selling SUV: गेल्या काही दिवसांत एसयूव्ही वाहनांकडे ग्राहकांचा ओढा वाढताना दिसत आहे. यामुळे, एसयूव्ही वाहनांच्या विक्रीतही मोठी वाढ झाल्याचे दिसत आहे. मारुती सुझुकीची लोकप्रिय सब-4 मीटर कॉम्पॅक्ट एसयूव्ही ब्रेझा आता देशवासीयांची आवडती एसयूव्ही बनली आहे. गेल्या महिन्यात, म्हणजे फेब्रुवारी २०२३ मध्ये देखील ती देशातील सर्वाधिक विकली जाणारी SUV होती. मारुती ब्रेझा हॅचबॅकने गेल्या मार्चमध्येही टाटा नेक्सॉन आणि ह्युंदाई क्रेटा तसेच टाटा पंच आणि मारुती सुझुकी ग्रँड विटारा सारख्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या एसयूव्हींना मागे टाकले. गेल्या मार्चमध्ये १६,२२७ लोकांनी मारुती ब्रेझा एसयूव्ही खरेदी केली होती.

मार्च महिन्यात ‘इतक्या’ लोकांनी खरेदी केली मारुती सुझुकी ब्रेझा

गेल्या फेब्रुवारीमध्येही ब्रेझाने नेक्सॉनला मागे टाकले होते. ८.२९ लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीसह, ब्रेझा देशवासियांची आवडती एसयूव्ही बनली आहे. मार्च २०२३ मध्ये, मारुती सुझुकी ब्रेझा SUV १६,२२७ लोकांनी खरेदी केली, जी मासिक आणि वार्षिक वाढ आहे. फेब्रुवारी २०२३ मध्ये ब्रेझाच्या १५,७८७ युनिट्सची विक्री झाली. मारुती ब्रेझा ही टाटा नेक्सॉनची राजवट संपवून आता सर्वाधिक विक्री होणारी एसयूव्ही बनली आहे.

Car blast protection avoid putting these things in your car boot trunk car safety tips
चक्क बॉम्बसारखी फुटेल कारची डिकी; गाडीत ‘या’ गोष्टी ठेवत असाल, तर सावधान! एक छोटीशी चूक पडेल महागात
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
car
Maruti Suzuki Price Hike: १ फेब्रुवारीपासून मारुती सुझुकीच्या कार महागणार! कोणत्या कारची किंमत किती वाढली आहे?
Kia Syros SUV price features
KIA च्या ‘या’ कारची लाँच आधीच बुकिंग सुरू; नेमकी इतकी मागणी का? फीचर्स काय आहेत, जाणून घ्या
Shark Tank Season 4 judges are well known in the country and here are the cars they own
BMW ते Mercedes-Benz पर्यंत… शार्क टँकचे १० शार्क्स या आलिशान कारचे आहेत शौकीन? वाचा कोणाकडे आहे कोणती कार?
Maruti Suzuki car price loksatta news,
‘या’ कार कंपनीकडून वाहनांच्या किमतीत मोठी वाढ
man sold car gifted by friend and buy an ambulance
असेही औदार्य! मित्रांनी भेट दिली कार, ती विकून घेतली रुग्णवाहिका…
Suzuki Access 125 price features amd more
स्कूटरप्रेमींनो, Suzuki Access 125 चे अपडेटेड व्हर्जन लाँच; जाणून घ्या किंमत, फीचर्स अन् सर्व काही

(हे ही वाचा : ७० हजाराच्या होंडाच्या स्कूटर्सने TVS Jupiter आणि Suzuki Access ला पछाडलं, खरेदीसाठी हजारो ग्राहकांच्या रांगा)

दुसऱ्या क्रमांकावर टाटा नेक्सॉन एसयूव्ही

गेल्या महिन्यात, म्हणजे मार्चमध्ये, टाटा मोटर्सची सर्वाधिक विक्री होणारी SUV Nexon ही दुसरी सर्वाधिक विक्री होणारी SUV होती. Nexon १४,७६९ ग्राहकांनी विकत घेतले. Tata Nexon ने गेल्या फेब्रुवारी २०२३ मध्ये १३,९१४ युनिट्सची विक्री केली होती, त्यामुळे या SUV च्या विक्रीत मासिक तसेच वार्षिक वाढ दिसून आली आहे. मार्चमध्ये तिसरी सर्वाधिक विक्री होणारी SUV Hyundai Creta होती, जी १४,०२६ ग्राहकांनी खरेदी केली होती.

टाटा पंच चौथ्या क्रमांकावर

सर्वाधिक विक्री होणाऱ्या एसयूव्हीच्या यादीत टाटा पंच चौथ्या क्रमांकावर पोहोचली आहे. गेल्या महिन्यात १०,८९४ ग्राहकांनी पंच खरेदी केले. मारुती सुझुकी ग्रँड विटारा पाचव्या क्रमांकावर होती, जी मार्च २०२३ मध्ये १०,०४५ लोकांनी खरेदी केली होती.

Story img Loader