Discount Offers on Maruti Cars: देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीचे कार देशभरात खूप लोकप्रिय आहेत. मारुती या फेब्रुवारी महिन्यात आपल्या काही कारवर डिस्काउंट ऑफर देखील देत आहे, त्यामुळे जर तुम्ही देखील लवकरच नवीन मारुती कार घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे, यामध्ये Auto K10 पासून ते Swift पर्यंत अनेक मॉडेल्सचा समावेश आहे. मारुती सुझुकी त्यांच्या काही कारवर कॅशबॅकसह कॉर्पोरेट बोनस आणि एक्सचेंज ऑफरचा लाभ देत आहे. चला तर मग जाणून घेऊया कंपनीने त्याच्या मॉडेलवर किती सूट दिली आहे.
‘या’ कारवर दिला जातोय बंपर डिस्काउंट
Maruti Suzuki Alto K10
मारुती अल्टोच्या १० पेट्रोल प्रकारांवर ६२,००० रुपयांपर्यंतचे फायदे उपलब्ध आहेत. यामध्ये ४०,००० रुपयांची रोख सवलत, १५,००० रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि ७ हजार रुपयांपर्यंत कॉर्पोरेट सूट समाविष्ट आहे.
CNG मॉडेल्सवर ३९,००० रुपयांपर्यंतचे बेनिफिट्स मिळत आहेत.
Maruti Suzuki S-Presso
मारुती सुझुकीच्या S-Presso AMT आवृत्तीवर फेब्रुवारी २०२४ मध्ये एकूण ६१,००० रुपयांचे फायदे ऑफर केले जात आहेत, ज्यात ४०,००० रुपयांची रोख सवलत, १५,००० रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि ६,००० रुपयांची कॉर्पोरेट सूट यांचा समावेश आहे. त्याच वेळी, मॅन्युअल व्हेरिएंटवर ५६,००० रुपयांचे फायदे आहेत.
(हे ही वाचा : Brezza, Creta ना Punch ‘या’ SUV कारसमोर सर्व पडल्या फिक्या; ३० दिवसात १४ हजाराहून अधिक लोकांच्या घरात एंट्री, किंमत…)
Maruti Suzuki Celerio
मारुती सुझुकी सेलेरियोवर ६१,००० रुपयांचे फायदे देखील दिले जात आहेत, ज्यात ४०,००० रुपये रोख सूट, १५,००० रुपये एक्सचेंज बोनस आणि ६,००० रुपये कॉर्पोरेट सूट यांचा समावेश आहे. Maruti Suzuki Celerio CNG वर ३६,००० रुपयांचे फायदे उपलब्ध आहेत.
Maruti Suzuki Swift
मारुती सुझुकी स्विफ्टला लवकरच अपडेट मिळणार आहे. हे चाचणी दरम्यान दिसून आले आहे. सध्या, स्विफ्टवर ४२,००० किमतीचे फायदे उपलब्ध आहेत, ज्यात १५,००० रोख सवलत, २०,००० एक्सचेंज बोनस आणि ७,००० कॉर्पोरेट सूट यांचा समावेश आहे.
Maruti Suzuki Dzire
डिझायरलाही या वर्षी अपडेट मिळेल. चाचणी दरम्यान डिझायर फेसलिफ्ट देखील दिसली आहे. सध्या, त्याच्या सध्याच्या मॉडेलवर ३७,००० रुपयांपर्यंतचे फायदे मिळू शकतात, ज्यात १५,००० रोख सवलत, १५,००० एक्सचेंज बोनस आणि ७,००० रुपयांचे कॉर्पोरेट फायदे यांचा समावेश आहे.