Maruti Suzuki Car Sales: एसयूव्ही कारच्या लोकप्रियतेमुळे भारतात सेडान कारचे वर्चस्व कमी होत आहे. पण दरम्यान, मारुती सुझुकीची अशीच एक डिजायर सेडान कार आहे जी सतत टॉप १० मध्ये आपले स्थान कायम राखत आहे. तर दुसरीकडे मारुती सुझुकीकडे आणखी दुसरी सेडान कार आहे. ज्याची विक्री झपाट्याने कमी होत आहे. कंपनीने काही काळापूर्वी या कारला नवीन अवतारात लाँच केले होते, तरीही कारच्या विक्रीत कोणतीही वाढ दिसून येत नाही. चला तर जाणून घेऊया कोणती आहे ही कार…
कारच्या विक्रीत ८३ टक्क्यांनी घट
ही कंपनीची प्रीमियम सेडान कार आहे. त्याची विक्री सातत्याने कमी होत आहे. मार्च महिन्यात या कारचे ३०० युनिट्स विकले गेले आहेत. मार्च २०२२ मध्ये या कारच्या फक्त १८३४ युनिट्स विकल्या गेल्या होत्या. म्हणजेच, या आधारावर, कारच्या विक्रीत थेट ८३ टक्क्यांनी घट झाली आहे. सेडान कारच्या यादीत ती नवव्या क्रमांकावर आहे. पण मारुती सुझुकीच्या कारच्या विक्रीच्या बाबतीत ते तळाशी राहिले.
(हे ही वाचा : Car Cooling Tips: कडक उन्हातही तुमच्या कारला ठेवू शकता थंड, फक्त करा ‘हे’ काम )
कोणती आहे ही कार?
ही मारुतीची ‘Maruti Suzuki Ciaz’ कार आहे. या कारची किंमत ९.३० लाख रुपयांपासून सुरू होते आणि १२.२९ लाख रुपयांपर्यंत जाते. यात १.५-लिटर पेट्रोल इंजिन आहे, जे १०५PS पॉवर आणि १३८Nm टॉर्क जनरेट करते. कंपनीने फेब्रुवारी महिन्यात आपली Ciaz सेडान अपडेट केली होती. याला नवीन सुरक्षा वैशिष्ट्यांसह ड्युअल टोनचा बाह्य रंग देण्यात आला होता. कंपनीने इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम (ESP) आणि हिल-होल्ड असिस्ट हे Ciaz च्या सर्व प्रकारांमध्ये मानक वैशिष्ट्ये म्हणून दिले आहेत. सुरक्षिततेसाठी, कारला ड्युअल फ्रंट एअरबॅग, EBD सह ABS, मागील पार्किंग सेन्सर्स आणि ISOFIX चाइल्ड-सीट अँकरेज देखील मिळतात.