आजकाल भारतीय बाजारात कॉम्पॅक्ट MPV कारना मोठी मागणी आहे. कॉम्पॅक्ट एसयूव्ही कार भारतीय बाजारपेठेत वर्चस्व गाजवत आहेत. तुम्हाला बाजारपेठेत ६ लाख ते १२ लाख रुपयांच्या दरम्यानची चांगली कॉम्पॅक्ट एसयूव्ही खरेदी करता येऊ शकते आणि यातच तुमचे कुटुंब मोठे असेल तर सात सीटर कार खरेदी करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. त्यातच ग्राहकांना कारचे मायलेजही उत्तम हवे असते. भारतीय बाजारपेठेत एक अशी कार उपलब्ध आहेस जी बऱ्याच काळापासून लोकांच्या पसंतीस उतरत आहे.

आम्ही ज्या कारबद्दल तुम्हाला सांगत आहोत ही कार ना टाटाची आहे ना महिंद्राची आहे. ही कार देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीची आहे. किफायतशीर किंमत, प्रशस्त इंटिरियर आणि मायलेज यामुळे मारुतीची ही कार भारतीय बाजारपेठेत ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहे. दर महिन्याला या कारची विक्री मोठ्या प्रमाणात होत असते. महत्वाचे म्हणजे, ही कार अनेक वेळा देशातील सर्वाधिक विकली जाणारी सात सीटर कारही ठरली आहे.

vehicle got stuck on the railway track due to gravel stone at mothagaon village in dombivli
डोंबिवली मोठागाव रेल्वे फाटकात खडी टाकल्याने वाहने घसरण्याचे प्रमाण वाढले, दुचाकी स्वारांची सर्वाधिक अडचण
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
Petrol Diesel Price Changes
Petrol Diesel Price Changes : पेट्रोल-डिझेलच्या दरात घसरण? वाचा किती रुपयांनी कमी झाला इंधनाचा दर
shocking video
VIDEO : पेट्रोल भरल्यानंतर ग्राहकाने ५०० रुपये दिले नाही, पुढे कर्मचाऱ्याने असे काही केले… व्हिडीओ होतोय व्हायरल
The action taken by the Maharashtra Pollution Control Board against the Mercedes Benz company is controversial Pune news
शहरबात: मर्सिडीज बेंझ, राज्यातील उद्योग पलायन अन् शासकीय यंत्रणा…
Gold will cross the mark of 85 thousand in Diwali
दिवाळीत सोने ८५ हजारांचा टप्पा ओलांडणार! आजचे दर बघून ग्राहकांमध्ये…
Woman hit a man at petrol pump accident viral video on social media
बिचाऱ्याची काय चूक? स्कूटी चालवताना थेट पेट्रोल पंपावरच धडकली अन्…, VIDEO पाहून माराल कपाळावर हात
On the occasion of Pune Diwali the traffic police banned four wheelers in the central area
पुणे: मध्य भागात चारचाकी वाहनांना बंदी

कारचे इंजिन

ही कार पेट्रोल आणि सीएनजी अशा दोन इंजिन पर्यायांमध्ये येते. ही एक एमपीव्ही कार आहे. ही कार LXi, VXi, ZXi आणि ZXi+ अशा चार व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे. यासोबतच कंपनीने या कारला सात वेगवेगळ्या कलरच्या ऑप्शनमध्येही बाजारात आणले आहे. इंजिन पॉवरट्रेनबद्दल बोलायचे झाले तर, यामध्ये १.५-लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे, जे १०२bhp पॉवर आणि १३७Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन ५-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स किंवा ६-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर युनिटशी जोडले जाऊ शकते. या व्यतिरिक्त, एक सीएनजी व्हर्जन देखील मिळते, जे ५-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्समध्ये ८७bhp पॉवर आणि १२१.५Nm टॉर्क देते. ही कार पेट्रोलवर २०.५१ किमी प्रति लीटर आणि सीएनजीवर २६.११ किमी प्रति किलो इतकं मायलेज देते.

सेफ्टी फीचर्स

मारुती सुझुकी या एमपीव्ही कारमधील सेफ्टी फीचर्सविषयी बोलायचं झाल्यास यामध्ये एंट्री लॉक ब्रेकिंग सिस्टिम, ब्रेक असिस्ट, सेंट्रल लॉकिंग, पॉवर डोअर्स, चाइल्ड सेफ्टी लॉक, अँटी थेफ्ट अलार्म, ४ एअरबॅग्ज, डे अँड नाईट रिअर व्ह्यू, पॅसेंजर साइड रिअर व्ह्यू मिरर, रियर सीट बेल्ट वॉर्निंग, अॅडजस्टेबल सीट, क्रॅश सेन्सर, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल, ब्रेकडाउन नोटिफिकेशन, स्टोलन व्हेईकल नोटिफिकेशन अँड ट्रॅकिंग, ट्रॅकिंग, एरिया गायलेन्स अराउंड डेस्टिनेशन, व्हेईकल लोकेशन शेअरिंग, ब्रेक इमरजन्सी रीजनरेशन, रियर कॅमेरा, स्पीड अलर्ट आणि हिल असिस्टसह इतर अनेक सेफ्टी फीचर्स यात देण्यात आले आहेत.

किंमत

आज आम्ही तुम्हाला मारुती एर्टिगा ७ सीटर कारबद्दल सांगत आहोत. ही ७ सीटर कार भारतीय बाजारात सर्वाधिक विकली जाणारी कार आहे. सर्वाोत्तम फीचर्ससह सुसज्ज असलेली कार म्हणजे मारुती एर्टिगा, ही देशातली सर्वाधिक विकली जाणारी ७ सीटर कार आहे. या कारची किंमत ८.६४ लाख रुपयांपासून सुरू होते. तर टॉप व्हेरियंटसाठी १३.०८ लाख रुपयांपर्यंत जाते.