Maruti Suzuki Car Discount June 2023: मारूती सुझुकी ही एक लोकप्रिय वाहन उत्पादक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी नवनवीन कार्स बाजारामध्ये लॉन्च करत असते. सध्या जून महिन्यामध्ये मारूती सुझुकीच्या कार्सवर पैसे वाचवण्याची चांगली संधी आहे. कारण कंपनी जून २०२३ या महिन्यामध्ये सेलेरिओ, अल्टो, इको, स्विफ्ट आणि डिझायरसह अनेक गाड्यांवर मोठ्या प्रमाणामध्ये डिस्काउंट देत आहे. या कार्सवर किती डिस्काउंट मिळणार आहे तर कोणत्या कार्सवर डिस्काउंट मिळणार नाही याबाबत माहिती जाणून घेऊयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मारूती या जून महिन्यात काही निवडक मॉडेल आणि व्हेरिएंटवर ६१,००० रूपये इतका डिस्काउंट देत आहे. तर इग्निस, बलेनो आणि ग्रँड विटारा सारख्या कार्सवर कोणत्याही प्रकारचा डिस्काउंट ऑफर मिळणार नाही. एक महत्वाची गोष्ट म्हणजे, इतर महिन्यांप्रमाणे जूनमध्ये मारूतीच्या काही निक CNG व्हेरिएंटवर देखील सूट उपलब्ध आहे. याबाबतचे वृत्त Financial Express ने दिले आहे.

हेही वाचा : महिंद्रा Thar Vs मारूती सुझुकी Jimny: मायलेजमध्ये दोघांपैकी कोण आहे सर्वोत्तम? जाणून घ्या

मारूती सुझुकी Wagon R

जून महिन्यामध्ये कंपनी आपल्या वॅग्नरच्या १.० लिटर आणि १.२ लिटर पेट्रोल मॅन्युअल व्हेरिएंटवर ६१,००० रुयांची सूट देत आहे. त्याच्या AMT या ट्रिमवर २६,००० रूपये आणि मारूती सुझुकी वॅग्नर आर सीएनजी व्हेरिएंटवर ५७,१०० रुपयांची सूट देत आहे.

मारूती सुझुकी S-Presso

मारूती सुझुकीच्या एस-प्रेसो च्या मॅन्युअल गिअरबॉक्स व्हर्जनवर या महिन्यात ६१ हजार रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. तर याच्या AMT ट्रीम्सवर ३२,००० रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. तर जूनमध्ये एस-प्रेसो सीएनजी ट्रीम्सवर ५२,००० रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे.

मारूती सुझुकी Celerio

मारुतीच्या सेलेरिओ या पेट्रोल मॅन्युअल; व्हेरिएंटवर ६१,००० रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. AMT व्हर्जनवर ३१,००० रुपयांचा तर CNG ट्रीम्सवरती ५७,००० रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे.

हेही वाचा : ह्युंदाई Exter vs मारूती सुझुकी Fronx: इंजिन, सेफ्टी फीचर्समध्ये कोण आहे बेस्ट? खरेदी करण्यापूर्वी एकदा पहाच

मारूती सुझुकी Alto K10

मारूती सुझुकीने अल्टो के १० ला मागच्या वर्षी अपडेटसह लॉन्च केले आहे. जूनमध्ये या गाडीच्या मॅन्युअल व्हेरिएंटवर ५७,००० रुपयांची सूट आहे. तसेच AMT व्हर्जनवर ३२ हजार आणि सीएनजी व्हेरिएंटवर ४७,००० रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे.

स्विफ्ट आणि डिझायर

मारूती सुझुकीची स्विफ्ट ही एक लोकप्रिय हॅचबॅक आहे. या वर्षी जून २०२३ या महिन्यात स्विफ्ट LXI मॉडेलवर ४७,००० रुपयांची सूट मिळत आहे. तसेच स्विफ्टच्या सर्व पेट्रोल व्हेरिएंटवर ५२ हजार रुपयांची सूट उपलब्ध आहे. CNG मॉडेलवर १८,१०० रुपयांची सूट मिळत आहे. तर डिझायर गाडीच्या सर्व पेट्रोल व्हेरिएंट, मॅन्युअल आणि AMT मोडलेवर १७ ,००० चा डिस्काउंट मिळत आहे.

Eeco

जून महिन्यात इको गाडीवर ३९,००० रुपयांची सूट मिळत आहे. तर सीएनजी व्हर्जनमध्ये ३७,१०० रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maruti suzuki discount june 2023 up to rs 61000 swift dezire alto k 10 and any varients check all list and offers tmb 01