Maruti Suzuki Discounts Feb 2023: मारुती सुझुकी ही देशातील सर्वात मोठी कार विकणारी कंपनी आहे. स्वस्त कारच्या बाबतीतही या कंपनीकडे जास्तीत जास्त पर्याय उपलब्ध आहेत. मारुती सुझुकी अल्टोपासून वॅगनआर आणि स्विफ्टपर्यंतच्या कार बाजारात विकते. जानेवारी महिन्यातही या तिन्ही गाड्यांची चांगलीच विक्री झाली आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्हीही यापैकी एखादी कार घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. फेब्रुवारीमध्ये कंपनी या कार्सवर सूट देत आहे. कंपनीच्या कारवर ४६ हजार रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘या’ गाड्यांवर मिळत आहे भरघोस सूट

Maruti Suzuki S-Presso

Maruti Suzuki S Presso ला त्याच्या MT प्रकारावर ४६,००० रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. यामध्ये २५,००० रोख सवलत, १५,००० एक्सचेंज बोनस आणि ६,००० कॉर्पोरेट सूट यांचा समावेश आहे.

(हे ही वाचा: Upcoming Cars: नवीन गाडी खरेदी करायच्या विचारात आहात? लवकरच ‘या’ कार होणार लाँच )

Maruti Suzuki Alto K10
Maruti Suzuki Alto K10 वर ३७,००० रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. यामध्ये १५,००० ची रोख सवलत, १५,००० चे एक्सचेंज बोनस आणि ७,००० कॉर्पोरेट फायदे यांचा समावेश आहे.

Maruti Suzuki Alto 800
मारुती सुझुकी अल्टो 800 च्या हाय-स्पेक व्हेरिएंटवर ३६,००० रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. या सवलतीमध्ये १५,००० एक्सचेंज बोनस १५,००० रोख सूट आणि ८,००० कॉर्पोरेट लाभांचा समावेश आहे.

Maruti Suzuki WagonR
Maruti Suzuki WagonR च्या पेट्रोल मॅन्युअल वेरिएंटवर ३६,००० रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. यामध्ये १५,००० एक्सचेंज बोनस, १५,००० रोख सवलत आणि ६००० कॉर्पोरेट सूट यांचा समावेश आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maruti suzuki discounts feb 2023 take a read to figure out how much you can save this month on a maruti suzuki car pdb