Maruti Suzuki Dominates the Top 10 List with Six Positions: मारुती सुझुकी वाहन बाजारपेठत कार विक्रीत नेहमी आघाडीवर असते. या महिन्यात पुन्हा एकदा मारुतीच्या कारने सर्वाधिक विक्री नोंदवून मोठ्या नावांना धूळ चारली आहे. ही कार मारुती सुझुकी वॅगन आर असून (Maruti Suzuki Wagon R) पुन्हा एकदा, वॅगन आर जून महिन्यात सर्वाधिक विक्री झालेल्या वाहनांपैकी एक ठरली आहे. दुसरीकडे, जर आपण टॉप १० वाहनांबद्दल बोललो तर, मारुती सुझुकीच्या निम्म्याहून अधिक वाहने या क्रमवारीत आहेत.

तथापि, या महिन्यात भारतीय ऑटोमोबाईल बाजारात काहीशी सुस्ती नक्कीच होती आणि मेच्या तुलनेत जूनच्या विक्रीत २ टक्के घट नोंदवली गेली आहे. मे २०२३ मध्ये ३.३५ लाख युनिट्सची विक्री झाली होती, तर जूनमध्ये ती ३.२७ लाख युनिट्स होती. दुसरीकडे, त्यात वार्षिक २ टक्के वाढ झाली आहे.

Changes in gold prices What are today gold rates
सोन्याच्या दरात मोठे बदल… हे आहेत आजचे दर…
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Petrol and Diesel Prices on 27 December
Petrol And Diesel Prices : महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर! तुमच्या शहरांत एक लिटरसाठी किती रुपये मोजावे लागतील?
loksatta editorial on rupee getting weaker day by day against the dollar
अग्रलेख : बबड्या रुपया, कारटा डॉलर
Having trouble starting your car in winter
हिवाळ्यात गाडी सुरू करण्यात अडचणी येतायत? ‘या’ गोष्टी एकदा तपासून पाहा
Pune Video
पुणेकराने बनवली फॅन्सी ऑटोरिक्षा; तुम्ही कधी या रॉयल ऑटोरिक्षामध्ये प्रवास केला का? VIDEO एकदा पाहाच
honda and nissan merging plan
बड्या जपानी मोटारकंपनीला घरघर… होंडा-निस्सानने विलिनीकरणचा पर्याय का निवडला?
pune wagholi accidents loksatta news
पुण्यात ‘या’ रस्त्यावरून क्षमतेपेक्षा जास्त वाहनांचा प्रवास, प्रवाशांसाठी का ठरतोय जीवघेणा?

पाहा कोणी मारली बाजी

मारुती वॅगन आरने जूनमध्ये १७,४८१ कारची विक्री केली. दुसऱ्या क्रमांकावर कंपनीची लोकप्रिय हॅचबॅक स्विफ्ट होती. या कारच्या १५,९५५ युनिट्सची विक्री नोंदवण्यात आली. यावेळी ह्युंदाईने मारुतीची जागा तिसऱ्या क्रमांकावर घेतली असून कंपनीच्या क्रेटा एसयूव्हीच्या १४,४४७ युनिट्सची विक्री झाली आहे. मारुती सुझुकी बलेनो चौथ्या स्थानावर आहे आणि तिच्या १४,०७७ युनिट्सची विक्री झाली.

(हे ही वाचा : Grand Vitara, Creta चा गेम होणार? देशात नव्या अवतारात दाखल झाली सर्वात सुरक्षित कार, मिळतील ३२ सेफ्टी फीचर्स )

टाटांच्या विक्रीतही वाढ

टाटा मोटर्सने पुन्हा एकदा एसयूव्ही सेगमेंटमध्ये चांगली विक्री दर्शविली आहे आणि टाटा नेक्सॉनच्या विक्रीत वाढ झाली आहे. कंपनीने Nexon चे १३,८२७ युनिट्स विकले आहेत. तर Hyundai Venue ११,६०६ युनिट्ससह सहाव्या स्थानावर आहे. मारुती सुझुकीची सर्वाधिक विक्री होणारी बजेट कार अल्टोने केवळ ११,३२३ युनिट्स विकल्या आणि सातव्या क्रमांकावर राहिली.

टाटाच्या मायक्रो एसयूव्ही पंचने या यादीत पुन्हा एकदा स्थान मिळवले आहे आणि १०,९९० युनिट्सच्या विक्रीसह कार आठव्या स्थानावर आहे. दुसरीकडे, मारुती सुझुकी ब्रेझा १०,५७८ युनिट्ससह नवव्या स्थानावर आणि १०,४८६ युनिट्सच्या विक्रीसह ग्रँड विटारा दहाव्या स्थानावर पोहोचण्यात यशस्वी झाली आहे.

होंडाला यादीत स्थान नाही

होंडा कारने या यादीत स्थान मिळवले नाही. तसेच टोयोटाच्या कोणत्याही वाहनाला या यादीत स्थान मिळालेले नाही. तथापि, दोन्ही कंपन्या सणासुदीच्या काळात त्यांच्या नवीन कार सादर करण्याच्या तयारीत आहेत आणि आगामी काळात दोन्ही विक्रीत तेजी दिसून येईल. त्याच वेळी, टाटा आपल्या नवीन नेक्सॉनसह इलेक्ट्रिक कारची यादी वाढवण्याच्या तयारीत आहे.

Story img Loader