Maruti Suzuki Dzire 2024 : मारुति सुझुकी कंपनी त्यांच्या ग्राहकांसाठी नवनवीन ऑफर्स आणि कार मॉडेल आणत असतात. आता कंपनीने नव्या मारुती सुझुकी डिझायर मॉडेलची घोषणा केली आहे. ही कार ११ नोव्हेंबरला लाँच होणार असून सर्वांचे लक्ष या कारने वेधले आहे. या सेडान डिझायर कारविषयी आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.

New Maruti Suzuki Dzire 2024: डिझाइन

ही डिझायर स्विफ्ट सारखी दिसू नये म्हणून कंपनी या कारसाठी विशेष मेहनत घेत आहे. सेडान ही त्याच्या हॅचबॅक सिबलिंगसारखी आहे पण कंपनीच्या मते, ही थोडी वेगळी आणि प्रिमियम असावी, त्याची वेगळी ओळख निर्माण व्हावी.

MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Daily Horoscope On 30 October
३० ऑक्टोबर पंचांग: दिवाळीआधीच येईल सोनेरी संधी, आर्थिक…
Royal Enfield Interceptor Bear 650 unveiled price features and performance will launch soon in india
नाद करायचा नाय! Royal Enfield आणतेय ‘ही’ नवीकोरी बाईक, कमाल फिचर्स, दमदार परफॉरमन्स अन् किंमत…
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Sakshi Malik on Brij Bhushan Sharan Singh sexual harassment
Sakshi Malik: “ब्रिजभूषण सिंह यांनी त्यांच्या बेडवर मला…”, लैंगिक अत्याचार प्रकरणी साक्षी मलिकचा धक्कादायक दावा
Palghar MLA Shrinivas Vanga return
Shrinivas Vanga: ‘आधी रडले, ठाकरेंना देव म्हणाले’, घरी परतल्यावर आमदार श्रीनिवास वनगांचे सूर बदलले; म्हणाले, “एकनाथ शिंदे…”
NCP Sharad Pawar Third Candidate List
NCP Sharad Pawar Third Candidate List : मोठी बातमी! शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तिसरी यादी जाहीर; धनंजय मुंडेंच्या विरोधात दिला ‘हा’ तगडा उमेदवार
Mahavikas Aghadi News
MVA News : महाविकास आघाडीत पहिली ठिणगी? ‘हा’ पक्ष वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत?

मिडिया रिपोर्टनुसार, डिझायरच्या नव्या लूकमध्ये तुम्हाला हनीकॉम्ब ग्रिलला नव्या डिझाइनमध्ये दिसेल ज्यामध्ये ऑडीच्या विशिष्ट लूकची आठवण करून देणारे बोल्ड हॉरिजॉन्टल स्लॅट्स आहे. हे डिजायर आपल्या स्वीट, गर्ल-नेक्स्ट-डोर लुक अपडेट करून अधिक चांगल्या प्रकारे स्ट्रीट प्रेजेंसमध्ये दिसून येईल.

मारुति सुझुकीने लाइटिंगमध्ये बदल केला आहे ज्यामध्ये नवी डिझाइनसाठी फ्रंट बम्परमध्ये शार्प नवीन अँगुलर एलईडी हेडलँप आणि एलईडी फॉग लँप जुळविण्यात आले आहे. साइड प्रोफाइलला एक प्रमुख शोल्डर लाइन, स्टायलिश मेटल फिनिश्ड विंडोसिल आणि आकर्षक डुअल टोन अलॉय व्हील्स द्वारे डिझाइन केले आहे. मागच्या बाजूला डिझाइनला स्लीक एलईडी टेल लँप आणि त्याच्या वर स्थित पातळ मॅटेलिक पट्टीने वाढवले आहे.

Maruti Suzuki Dzire 2024: इंटीरियर और फीचर्स

मारुती सुझुकीने डिझायरमध्ये अनेक नवीन फीचर्सचा समावेश करून अपडेट केले आहे. या नव्या डिझायरमध्ये सिंगल पॅनल सनरूफ आहे जो या सेगमेंटमध्ये पहिल्यांदा दिसेल. स्विफ्टप्रमाणए अपडेटेड डिझायरमध्ये ९ इंच इंफोटेनमेंट सिस्टिम, ऑटोमॅटिक क्लायमेंट कंट्रोल, वायरलेस फोन चार्जर, ३६० डिग्री कॅमेरा आणि मल्टी इन्फॉर्मेशन डिस्प्लेचा अॅनालॉग इंस्ट्रुमेंट क्लस्टर असू शकतो.

सुरक्षेच्या दृष्टिकोनातून, डिझायरमध्ये सहा एअरबॅग, हिल होल्ड असिस्ट, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा आणि अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टिम आणि इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्यूशन सारख्या सुविधांचा समावेश आहे.

Maruti Suzuki Dzire 2024: इंजिन स्पेसिफिकेशन

नव्या डिझायरमध्ये स्विफ्टप्रमाणे १.२ लीटर तीन सिलेंडर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन असेल, जे ८० बीएचपी आणि १११.७ एनएमचा टॉर्क निर्माण करते. ५-स्पीड मॅनुअल आणि ५-स्पीड एएमटी या दोन ट्रान्समिशन पर्यायाबरोबर ही डिझायर उपलब्ध असेल. याशिवाय मारुति सुझुकी डिजायरचा सीएनजी व्हेरिअंट सुद्धा लाँच करू शकते.