Best Selling Sedan In April: भारतीय ग्राहक आता SUV कारला जास्त पसंती देत ​​आहेत, अशा परिस्थितीत सेडान कारच्या विक्रीत संथ गती दिसून येत आहे. जेव्हा आपण काही लोकप्रिय कॉम्पॅक्ट सेडान कार्सबद्दल बोलतो, त्यापैकी मारुतीच्या कारने टाटा आणि ह्युंदाई सारख्या कंपन्यांना मोठ्या फरकाने मागे टाकले आहे. ती दर महिन्याला सर्वाधिक विकली जाणारी सेडान आहे. विशेष म्हणजे लक्झरी फीचर्ससोबतच यामध्ये CNG चा पर्यायही उपलब्ध आहे. एप्रिल महिन्यात मारुती सुझुकी डिझायर ही सेडान सेगमेंटमध्ये सर्वाधिक विक्री झाली आहे. तथापि, त्याच्या विक्रीत ५ टक्क्यांनी घट झाली आहे. आज आम्ही तुम्हाला एप्रिल महिन्यातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या ५ सेडान कारची माहिती देणार आहोत.

‘या’ पाच सेडान कारची विक्री जोरात

Maruti Suzuki Dzire – एप्रिल २०२३ मध्ये १०,१३२ युनिट्सची विक्री झाली (एप्रिल २०२२: १०,७०१ युनिट्स). वार्षिक आधारावर ५ टक्क्यांची घट.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

Hyundai Aura – एप्रिल २०२३ मध्ये ५,०८५ युनिट्स विकल्या गेल्या (एप्रिल २०२२: ४,०३५ युनिट्स). २६ टक्क्यांची वार्षिक वाढ.

Honda Amaze – एप्रिल २०२३ मध्ये ३,३९३ युनिट्स विकल्या गेल्या (एप्रिल २०२२: ४,४६७ युनिट्स). वार्षिक आधारावर २४ टक्क्यांची घट.

(हे ही वाचा : मारुतीच्या ‘या’ SUV कारसाठी ग्राहक झाले वेडे, ५ महिन्यांत ३०,००० हून अधिक लोकांनी केली बुकींग, किंमत फक्त… )

Tata Tigor  – एप्रिल २०२३ मध्ये ३,१५४ युनिट्स विकल्या गेल्या (एप्रिल २०२२: ३,८०३ युनिट्स). वार्षिक आधारावर १७ टकक्यांची घट.

Maruti Ciaz  – एप्रिल २०२३ मध्ये १,०१७ युनिट्स विकल्या गेल्या (एप्रिल २०२२: ५७९ युनिट्स). ७६ टक्क्यांची वार्षिक वाढ.

मारुती डिझायर किंमत आणि वैशिष्ट्ये

Maruti Suzuki Dzire ची किंमत ६.५१ लाख रुपयांपासून सुरू होते आणि ९.३९ लाख रुपयांपर्यंत जाते. ही भारतातील सर्वात मायलेज कार्यक्षम सीएनजी कार आहे. त्याचे मायलेज ३१km/kg आहे. कार १.२-लीटर पेट्रोल इंजिनसह उपलब्ध आहे, ज्याला CNG पर्याय देखील मिळतो. पेट्रोल मोडमध्ये इंजिन ८९bhp पॉवर निर्माण करते, तर CNG मोडमध्ये ७६bhp पॉवर उत्पादन करते. यात ५-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आहे.