Best Selling Sedan: भारतात सेडान कारची बाजारपेठ मर्यादित राहिली आहे. १० लाखांपेक्षा कमी बजेटमध्ये मोजक्याच सेडान कार उपलब्ध आहेत. सेडान कारच्या विक्रीतही घट झाली आहे. बाजारात सेडान कारची विक्री चांगली होत नाही. लोक बहुतेक XUV कडे वळत आहेत. तथापि, या वर्षी Honda City आणि Hyundai Verna सारख्या लोकप्रिय सेडानच्या फेसलिफ्टेड आवृत्त्या लाँच झाल्या, ज्यांना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला परंतु तरीही सर्वाधिक विक्री होणारी सेडान ही दुसरीच आहे. मारुती डिझायर असे त्याचे नाव आहे.
मारुती डिझायर ही जुलै २०२३ मध्ये सर्वाधिक विक्री होणारी सेडान ठरली आहे. डिझायरच्या विक्रीत थोडीशी घसरण झाली असली तरी ती अजूनही सर्वाधिक विक्री होणारी सेडान राहिली. जुलै २०२३ मध्ये मारुती डिझायरच्या विक्रीत सुमारे ३ टक्के (वार्षिक आधारावर) घट नोंदवली गेली आहे, ज्यामुळे जुलै २०२२ मध्ये विकल्या गेलेल्या १३,७४७ युनिट्सच्या तुलनेत १३,३९५ युनिट्सची विक्री झाली. यासह, सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारमध्ये (जुलै २०२३) सहाव्या क्रमांकावर आहे.
(हे ही वाचा : मारुतीच्या स्वस्त SUV समोर Nexon ना Creta, सर्व पडल्या फिक्या; झाली धडाक्यात विक्री, खरेदीसाठी लागल्या रांगा )
मारुती डिझायर कशी आहे खास?
मारुती डिझायरची किंमत ६.५१ लाख रुपयांपासून सुरू होते आणि ९.३९ लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम) जाते. हे १.२-लीटर ड्युअलजेट पेट्रोल इंजिनसह येते, जे ९० पीएस पॉवर आणि ११३ एनएम टॉर्क जनरेट करते. यात मानक म्हणून ५-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स मिळतो तर ५-स्पीड AMT गिअरबॉक्स पर्यायी आहे. सीएनजीवर इंजिन ७७ पीएस पॉवर आणि ९८.५ एनएम टॉर्क जनरेट करते. CNG व्हेरियंट फक्त ५-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह येतो.