मारुती सुझुकी वॅगनआर ही जून महिन्यात देशात सर्वाधिक विकली जाणारी कार ठरली आहे. दुसऱ्या क्रमांकावर मारुती स्विफ्ट आणि तिसऱ्या क्रमांकावर ह्युंदाई क्रेटा आहे. हॅचबॅक आणि एसयूव्ही व्यतिरिक्त देशात सर्वाधिक मागणी सात सीटर कारची आहे. मारुती एर्टिगा बराच काळ सर्वाधिक विकली जाणारी ७ सीटर राहिली. तथापि, मे नंतर, जून महिन्यात, एका स्वस्त ७ सीटर कारनं एर्टिगाला मागे टाकले आणि सर्वाधिक विक्री झाली. Ertiga च्या टॉप मॉडेलची किंमत १३ लाख रुपये आहे, तर तुम्हाला या दुसऱ्या कारचा टॉप व्हेरिएंट फक्त ६.५ लाख रुपयांमध्ये मिळेल.
‘या’ सात सीटर कारचा देशात बोलबाला
जून महिन्याच्या अहवालानुसार, मारुती सुझुकी Eeco ही देशातील सर्वाधिक विकली जाणारी ७ सीटर कार बनली आहे. जून महिन्यात या कारची विक्री ९,३५४ युनिट्स होती, ज्यामुळे ती एकूण कारच्या यादीत अकराव्या स्थानावर आली आहे. तर दुसरी सर्वाधिक विक्री होणारी सीटर कार मारुती एर्टिगा आहे. जून महिन्यात ८,४२२ मोटारींची विक्री झाली आहे.
(हे ही वाचा : कारमध्ये एअरबॅग असल्यास सीटबेल्ट घालण्याची गरज नाही का? गडकरींनी स्पष्टच सांगितलं, “प्रवाशांच्या सुरक्षेसाठी…” )
मारुती सुझुकी Eeco च्या वाढत्या लोकप्रियतेचे कारण म्हणजे त्याच्या प्रकारांची आकर्षक किंमत. Ertiga च्या टॉप मॉडेलची किंमत १३ लाख रुपये आहे, तर Eeco च्या टॉप व्हेरिएंटची किंमत फक्त ६.५ लाख रुपये आहे. हे ६ आणि ७ सीटर पर्याय देते. हे पेट्रोल आणि सीएनजी अशा दोन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध आहे.