Cheapest 7 Seater Car: मारुती सुझुकीची सर्वात कमी किमतीची ७ सीटर कार Maruti Eeco चे नाव देशात सर्वाधिक विकली जाणारी व्हॅन म्हणून नोंदवण्यात आले आहे. मारुती सुझुकी इको कंपनीने २०१० मध्ये पहिल्यांदा लाँच केली होती. २०१० ते २०२३ या कालावधीत कंपनीने या व्हॅनच्या १० लाख युनिट्सची विक्री करून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. Eeco ला तिचे पहिले ५ लाख युनिट्स विकण्यासाठी ८ वर्षे लागली, तर पुढील ५ लाख युनिट विक्रीचा टप्पा गाठण्यासाठी ५ वर्षांपेक्षा कमी कालावधी लागला.
मारुती Eeco सध्या ५-सीटर, ७-सीटर, कार्गो, टूर आणि अॅम्ब्युलन्ससह १३ प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, १ दशलक्ष ग्राहकांसह ९४ टक्क्यांपेक्षा जास्त मार्केट शेअरसह Eeco ने व्हॅन विभागात वर्चस्व कायम राखले आहे.
तुमचेही मोठे कुटुंब असेल ज्यासाठी तुम्हाला कमी बजेटमध्ये ७ सीटर कार खरेदी करायची आहे किंवा तुम्हाला डिलिव्हरी किंवा टूर आणि ट्रॅव्हलचा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर मारुती सुझुकी इकोची किंमत, इंजिन, मायलेज आणि वैशिष्ट्ये यांचे तपशील येथे जाणून घ्या.
(हे ही वाचा : क्रेटा आणि सेल्टॉसचा खेळ खल्लास? नव्या अवतारात येतेय दमदार फीचर्स अन् हायब्रिड इंजिनसह ‘ही’ 7 सीटर SUV )
मारुती Eeco ची किंमत
Maruti Eeco ची किंमत ५.२५ लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) पासून सुरू होते आणि टॉप मॉडेलसाठी ६.५१ लाख रुपयांपर्यंत जाते.
मारुती Eeco मध्ये किती प्रकार आहेत?
मारुती सुझुकी ईकोचे चार ट्रिम्स मध्ये उपलब्ध आहे. ज्यात पहिले ५ सीटर स्टँडर्ड (ओ) दुसरे ५ सीटर एसी (ओ), तिसरे फाइव्ह सीटरचे एसी सीएनजी (ओ) आणि चौथे ७ सीटरचे स्टँडर्ड (ओ) आहे.
मारुती ईको इंजिन आणि ट्रान्समिशन
मारुती Eeco मध्ये उपलब्ध असलेले इंजिन ११९७ सीसी १.२ लिटर पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन ८१ PS पॉवर आणि १०४.४ Nm पीक टॉर्क जनरेट करते. कंपनीने या इंजिनसोबत ५-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन जोडले आहे.
(हे ही वाचा : Nexon सोडून ‘या’ इलेक्ट्रिक कारच्या मागे लागले भारतीय, ५ मिनिटांच्या चार्जमध्ये मिळणार १०० किलोमीटरची रेंज )
मारुती Eeco मायलेज
मारुती सुझुकीचा दावा आहे की पेट्रोलवर Eeco चे मायलेज १९.७१ kmpl आहे आणि CNG वर हे मायलेज २६.७८ kmpl पर्यंत वाढते. हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे.
मारुती Eeco वैशिष्ट्ये
मारुती ईको मध्ये, कंपनीने डिजिटायझ्ड स्पीडोमीटर, एसी साठी रोटरी डायलर, रिक्लिनिंग फ्रंट सीट्स, मॅन्युअल एसी, १२ वोल्ट चार्जिंग सॉकेट, समोरच्या सीटवर ड्युअल एअरबॅग्ज, ईबीडीसह अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम, फ्रंट सीट बेल्ट रिमाइंडर, स्पीड अलर्ट, मागील वैशिष्ट्ये यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. पार्किंग सेन्सर दिले आहेत.