7 Seater Car: तुमचं कुटुंब मोठं असेल तर तुमच्यासाठी ७ सीटर कार एक प्रॅक्टिकल पर्याय ठरेल. या कारमध्ये अधिक स्पेस मिळते. परंतु ७ सीटर कार या महाग असतात असं बऱ्याच जणांना वाटतं. परंतु भारतीय वाहन बाजारात अनेक ७ सीटर कार आहेत ज्या तुम्ही हॅचबॅक किंवा छोट्या सेडान कारच्या किंमतीत खरेदी करू शकता. अशाच आज आम्ही तुम्हाला मारुती एर्टिगा ७ सीटर कारबद्दल सांगत आहोत. ही ७ सीटर कार भारतीय बाजारात सर्वाधिक विकली जाणारी कार आहे.
Maruti Ertiga
सर्वाोत्तम फीचर्ससह सुसज्ज असलेली कार म्हणजे मारुती अर्टिगा, ही देशातली सर्वाधिक विकली जाणारी ७ सीटर कार आहे. या कारची किंमत ८.६४ लाख रुपयांपासून सुरू होते. ही कार पेट्रोल आणि सीएनजी अशा दोन इंजिन पर्यायांमध्ये येते. ही एक एमपीव्ही कार आहे. यामध्ये १.५ लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन माईल्ड हायब्रिड टेक्नोलॉजीसह सुसज्ज आहे. यातलं इंजिन १०३PS पॉवर आणि १३७Nm टॉर्क आउटपुट देऊ शकतं. सीएनजीवर ही कार २६ किमीपर्यंतचं मायलेज देते.
(हे ही वाचा : ७ लाखांपेक्षा कमी किमतीच्या ‘या’ कारसमोर बाजारात सगळ्या पडल्या फेल, खरेदीसाठी हजारो ग्राहकांच्या रांगा )
Maruti Ertiga किती सुरक्षित आहे?
मारुती सुझुकी अर्टिगा या एमपीव्ही कारमधील सेफ्टी फीचर्सविषयी बोलायचं झाल्यास यामध्ये एंट्री लॉक ब्रेकिंग सिस्टिम, ब्रेक असिस्ट, सेंट्रल लॉकिंग, पॉवर डोअर्स, चाइल्ड सेफ्टी लॉक, अँटी थेफ्ट अलार्म, ४ एअरबॅग्ज, डे अँड नाईट रिअर व्ह्यू, पॅसेंजर साइड रिअर व्ह्यू मिरर, रियर सीट बेल्ट वॉर्निंग, अॅडजस्टेबल सीट, क्रॅश सेन्सर, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल, ब्रेकडाउन नोटिफिकेशन, स्टोलन व्हेईकल नोटिफिकेशन अँड ट्रॅकिंग, टो अवे अलर्ट आणि ट्रॅकिंग, एरिया गायलेन्स अराउंड डेस्टिनेशन, व्हेईकल लोकेशन शेअरिंग, ब्रेक इमरजन्सी रीजनरेशन, रियर कॅमेरा, स्पीड अलर्ट आणि हिल असिस्टसह इतर अनेक सेफ्टी फीचर्स यात देण्यात आले आहेत.
Maruti Ertiga मायलेज
ही कार पेट्रोलवर २०.५१ किमी प्रति लीटर आणि सीएनजीवर २६.११ किमी प्रति किलो इतकं मायलेज देते. यात ५-स्पीड मॅन्युअल आणि ६-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय मिळतो. CNG प्रकारांमध्ये फक्त मॅन्युअल गिअरबॉक्स उपलब्ध आहे.