मारुती एर्टिगा ही गेल्या जुलैमध्ये सर्वाधिक विकली जाणारी सात-सीटर कार होती. गेल्या महिन्यात त्याच्या विक्रीत बंपर उसळी पाहायला मिळाली. तसेच टॉप-५ सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारमध्येही स्थान मिळवले आहे. जुलै २०२३ मध्ये १४,३५२ युनिट्सची विक्री झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीशी तुलना केल्यास, जुलै (२०२२) मध्ये एकूण ९,६९४ युनिट्सची विक्री झाली. म्हणजेच, त्याची विक्री वार्षिक आधारावर ४८ टक्क्यांनी वाढली आहे.
इनोव्हा आणि केरेन्स ला टाकलं मागे
एर्टिगा ही एमपीव्ही कार आहे. एमपीव्ही मार्केटमध्ये ते इनोव्हा आणि केरेन्सला टक्कर देते. पण, ते यापेक्षा स्वस्त आहे. विक्रीच्या बाबतीत ते दोघांच्याही पुढे होते. जुलै २०२३ मध्ये, टोयोटा इनोव्हा हायक्रॉस आणि क्रिस्टा यांची एकत्रित विक्री ८,935 युनिट्स होती, तर गेल्या वर्षी (२०२२) जुलैमध्ये एकूण विक्री ६,९०० युनिट्स होती. म्हणजेच इनोव्हाच्या विक्रीत वार्षिक आधारावर 29% वाढ झाली आहे.
(हे ही वाचा : ६ एअरबॅग्ज असलेली देशातील लहान SUV एक लाख डाऊन पेमेंटमध्ये घेऊन जा घरी, जाणून घ्या EMI किती असेल?)
विक्रीच्या बाबतीत, किआ केरेन्स MPV सेगमेंटमध्ये इनोव्हा नंतर प्रथम क्रमांकावर होता, गेल्या वर्षी (२०२२) जुलैमध्ये विकल्या गेलेल्या ५,९७८ युनिट्सच्या तुलनेत जुलै २०२३ मध्ये एकूण ६,००२ युनिट्सची विक्री झाली. म्हणजेच, त्याच्या विक्रीत विशेष बदल झाला नाही.