मारूती सुझुकी एक लोकप्रिय वाहन उत्पादक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी ज्यामध्ये आधुनिक फीचर्स आणि अपडेट्स असतील अशी नवनवीन मॉडेल्स लॉन्च करत असते. नुकत्याच झालेल्या ऑटो एक्स्पो २०२३ मध्ये कंपनीने आपली अनेक मॉडेल सादर केली होती. कंपनीने आता इलेक्ट्रिक कारकडे लक्ष केंद्रित केल्यासारखे दिसून येत आहे. याचे कारण म्हणजे मारुती सुझुकीची पहिली इलेक्ट्रिक कार eVX टेस्टिंग दरम्यान पोलंडच्या रस्त्यावर दिसून आली आहे.
देशातील सर्वात मोठ्या कार उत्पादक कंपनीने या कारची झलक ऑटो एक्स्पो २०२३ मध्ये सादर केली होती. ही इलेक्ट्रिक कार २०२५ मध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे. याबाबतचे वृत्त Financial Express ने दिले आहे.
हेही वाचा : लॉन्चिंगपूर्वीच मारुती सुझुकीच्या Invicto चे डिझाईन झाले लीक, संपूर्ण डिटेल्स एकदा पहाच
eVX electric: डिझाईन
टेस्टिंग दरम्यान, पोलंडच्या रस्त्यावर दिसून आलेली eVX ई-कार पूर्णपणे काळ्या रंगाची होती. मात्र याच्या कार आणि डिझाईनबद्दल बोलायचे झाल्यास ही Grand Vitara Fronx आणि Grand Vitara सारखी दिसते. ऑटो एक्स्पो २०२३ मध्ये या इलेक्ट्रिक कारमध्ये व्हील्स रिम्सचे डिझाईन दाखवण्यात आले होते. मात्र टेस्टिंग दरम्यान स्पॉट झालेल्या ई-कारमध्ये मल्टीस्पोक अलॉय व्हील्स दिसून आले. मारूती eVXएक उंच असे बोनट हूड आहे आणि यामध्ये LED हेडलाईट्सला जोडणारी क्रोम स्ट्रीप देण्यात आली आह. हे सर्व मोठ्या आकाराच्या फ्रंट ग्रीलवर देण्यात आले आहे.
इंटेरिअर
मारुती eVX ही कंपनीची पहिली कार असेल ज्यामध्ये मोठ्या आकाराची स्क्रीन असेल. मोठ्या आकाराची ही स्क्रीन इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि इन्फोटेनमेंट टचस्क्रीन डिस्प्ले म्हणून देखील काम करेल. मात्र टेस्टिंग दरम्यान ई-कारचा डॅशबोर्ड पूर्णपणे झाकलेला होता. यावेळी टेस्टिंगमध्ये व्हर्टिकल रूपात डिझाईन केलेले एअर कंडिशन व्हेंट दिसून आले. आगामी ई-कारमध्ये अतिरिक्त जास्त जागा असेल. यामध्ये सेंट्रल कन्सोलच्या खाली स्टोरेज स्पेस असेल. याशिवाय ड्रायव्हर सीटखाली पॉवर इलेक्ट्रिक स्विच असेल.
हेही वाचा : नवीन कार खरेदी करायचा विचार करताय? तर मग आधी ‘या’ ५ गोष्टींविषयी जाणून घ्या
पॉवरट्रेन स्पेसिफिकेशन
मारुती सुझुकीकडून या इलेक्ट्रिक कारमध्ये मिळणाऱ्या पॉवरट्रेन स्पेसिफिकेशन बद्दल खुलासा केला नाही आहे. यामध्ये ६० KWh ची बॅटरी असेल. कंपनीचा दावा आहे की पूर्ण चार केल्यानांत इलेक्ट्रिक कार ५५० किमी इतकी रेंज देईल. मारुती eVX कार EV ला समर्पित अशा एका नवीन प्लॅटफॉर्मवर आधारित असेल. आकारमानाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास कारची लांबी ४,३०० मिमी, रुंदी १,८०० मिमी आणि उंची १,६०० मिमी इतकी असेल.