सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारच्या यादीत मारुती सुझुकीने दणका दिला आहे. टॉप १० पैकी ८ कार या कंपनीच्या आहेत. मारुती सुझुकीच्या मायक्रो SUV Fronx ने गेल्या महिन्यात उत्कृष्ट विक्री नोंदवली आहे. गेल्या महिन्यात, कारने टॉप-१० सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारच्या यादीत सातव्या स्थानावर स्थान मिळवले. यासह, एसयूव्ही सेगमेंटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर राहण्याचे मोठे यश मिळवले आहे.
या SUV ने जुलै २०२३ मध्ये १३,२२० युनिट्स विकल्या आहेत. टाटा नेक्सॉन आणि टाटा पंच व्यतिरिक्त, फ्रँक्सने गेल्या महिन्यात महिंद्रा स्कॉर्पिओ, ह्युंदाई व्हेन्यू आणि किया सेल्टोस सारख्या कारलाही मात दिली आहे. मारुती सुझुकी फ्रॉन्क्सची किंमत ७.४७ लाख रुपयांपासून सुरू होते.
(हे ही वाचा : Hero-Honda चे दणाणले धाबे, TVS ने ‘या’ टेक्नोलाॅजीसह नव्या अवतारात दाखल केला, देशात सर्वाधिक विकणारा स्कूटर )
Maruti Suzuki Fronx SUV मध्ये काय आहे खास
मारुती सुझुकी फ्रॉन्क्स भारतीय बाजारपेठेत एकूण १२ प्रकारांमध्ये सादर करण्यात आली आहे. हे मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन दोन्हीमध्ये उपलब्ध आहे.
फ्रॉन्क्सच्या केबिनला कनेक्टेड कार टेक, ३६०-डिग्री कॅमेरा, वायरलेस चार्जर, वायरलेस Apple CarPlay आणि Android Auto सह ९-इंच HD SmartPlay ProPlus इन्फोटेनमेंट सिस्टम मिळते. सुरक्षिततेच्या दृष्टीने, यात ६ एअरबॅग्ज, ३ पॉइंट ELR सीटबेल्ट, ESP सह हिल होल्ड असिस्ट, रोल ओव्हर मिटिगेशन, EBD आणि ब्रेक असिस्टसह ABS, ISOFIX चाइल्ड सीट अँकर आणि बरेच काही मिळते.
मारुती फ्रँक्समध्ये दोन इंजिन पर्याय उपलब्ध आहेत. याला १.०-लिटर टर्बो बूस्टरजेट इंजिन मिळते, जे ५.३ सेकंदात ० ते ६०km/h पर्यंत वेग वाढवू शकते. प्रगत १.२-लिटर के-सिरीज, ड्युअल जेट आणि ड्युअल VVT इंजिन देखील उपलब्ध आहेत, जे स्मार्ट हायब्रिड तंत्रज्ञानासह येतात. या इंजिनांना ६-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आणि पॅडल शिफ्टर्सचा पर्यायही दिला जातो. याचे मायलेज २२.८९km/l पर्यंत असू शकते.