Maruti Car Sales: ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपनी मारुती सुझुकीच्या कार्सना भारतीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे. ग्राहकांचा जास्तीत जास्त फीचर्स असलेल्या कार घेण्याकडे कल वाढला आहे. भारतीय ग्राहकांमध्ये SUV ची क्रेझ वाढताना दिसत आहे. देशात छोट्या आणि अफोर्डेबल एसयूव्हींची विक्री वाढत आहे. यातच आता मारुती सुझुकीने नुकतीच लाँच केलेल्या SUV ला ग्राहकांची बाजारपेठेत चांगली पसंती मिळत आहे.
मारुती सुझुकीच्या मायक्रो SUV Fronx ने उत्कृष्ट विक्री नोंदवली आहे. गेल्या महिन्यात म्हणजेच ऑक्टोबरमध्येही फ्रॉन्क्सच्या ११ हजारांहून अधिक वाहनांची विक्री झाली आणि अशा प्रकारे मायक्रो एसयूव्हीने आतापर्यंत ७५ हजार युनिट्सचा विक्रीचा टप्पा ओलांडला आहे. फ्रॉन्क्सने बाजारात चांगली पकड मिळवली आहे.
एप्रिल २०२३ मध्ये लाँच झाल्यानंतर पहिल्या महिन्यात फ्रॉन्क्सच्या ८ हजार ७८४७ युनिट्सची विक्री झाली होती. यानंतर मे महिन्यात ९ हजार ८६३ लोकांनी आणि जूनमध्ये ७ हजार ९९१ लोकांनी खरेदी हा कार खरेदी केली. या एसयूव्हीची जुलै महिन्यातही चांगली विक्री झाली होती, मात्र ऑगस्टपासून विक्रीत मोठी वाढ झाली. मारुती सुझुकी फ्रॉन्क्सने गेल्या ऑगस्टमध्ये १३ हजार २२० मोटारींची विक्री केली. यानंतर, सप्टेंबरमध्ये ११ हजार ४५५ युनिट्स खरेदी करण्यात आल्या आणि गेल्या महिन्यात म्हणजे ऑक्टोबरमध्ये ११ हजार ३५७ लोकांनी ही SUV खरेदी केली. एकंदरीत ऑक्टोबरमधील फ्रॉन्क्सच्या विक्रीचा आकडा ७५ हजारांच्या पुढे गेला आहे.
(हे ही वाचा : देशातील सर्वात स्वस्त ७ सीटर MPV कार मिळतेय आणखी स्वस्तात, मोठ्या कुटुंबासाठी परफेक्ट, ११ रंगात बाजारात उपलब्ध )
मारुती सुझुकी फ्रॉन्क्सला कंपनीने इंडियन मार्केटमध्ये एकूण १२ व्हेरियंट्स मध्ये आणले आहे. हे मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही ट्रान्समिशन मध्ये आहे. फ्रॉन्क्सच्या केबिनला कनेक्टेड कार टेक, ३६०-डिग्री कॅमेरा, वायरलेस चार्जर, वायरलेस Apple CarPlay आणि Android Auto सह ९-इंच HD SmartPlay ProPlus इन्फोटेनमेंट सिस्टम मिळते. सुरक्षिततेच्या दृष्टीने, यात ६ एअरबॅग्ज, ३ पॉइंट ELR सीटबेल्ट, ESP सह हिल होल्ड असिस्ट, रोल ओव्हर मिटिगेशन, EBD आणि ब्रेक असिस्टसह ABS, ISOFIX चाइल्ड सीट अँकर आणि बरेच काही मिळते.
मारुती सुझुकी फ्रॉन्क्स दोन इंजिन पर्यायांसह येते. यात १.२ लीटर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड इंजिन आणि १.० लीटर बूस्टर जेट इंजिन मिळते. १.२ लीटर ४ सिलेंडर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन ९०bhp पॉवर आणि ११३Nm पीक टॉर्क जनरेट करते. या कारचे मायलेज २२.८९kmpl पर्यंत आहे. या कारची सुरुवातीची किंमत ७.४६ लाख रुपये आहे. तर टॉप मॉडेलसाठी १३.१४ लाख रुपये मोजावे लागतात.