Maruti Suzuki Grand Vitara Dominion Edition: भारतीय बाजारपेठेतील मिडसाईज एसयूव्ही सेगमेंटमध्ये आपले वर्चस्व वाढवण्यासाठी आणि सणादरम्यान ग्राहकांना चांगले प्रोडक्ट्स देण्यासाठी, मारुती सुझुकीने आपल्या लोकप्रिय एसयूव्ही ग्रँड विटाराची नवीन डोमिनियन एडिशन लॉन्च केली आहे. ग्रँड विटाराच्या या लिमिटेड एडिशनच्या मॉडेलमध्ये, एक्स्टिरियर आणि इंटेरियरला अधिक चांगले आणि कंफरटेबल बनवले गेले आहे आणि त्यासाठी साइड स्टेप्स, रिअर स्किड प्लेट, बॉडी साइड मोल्डिंग, ड्युअल टोन सीट कव्हर, ऑल वेदर 3D मॅट्ससह अनेक फिचर्स अॅड करण्यात आले आहेत.
डोमिनियन एडिशन ग्रँड विटारा फक्त डेल्टा, झेटा आणि अल्फा व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. व्हेरिएंटवर अवलंबून, प्रत्येकाला वेगवेगळ्या किंमतीचे ऍक्सेसरी पॅकेज मिळते.
अल्फा व्हेरिएंटमध्ये सर्वाधिक फिचर्स
मारुती सुझुकी ग्रँड विटारा डोमिनियन एडिशनमधील अल्फा व्हेरिएंटच्या कॉम्प्लिमेंटरी पॅकेजची किंमत ५२,६९९ रुपये इतकी आहे. ग्रँड विटाराच्या अल्फा व्हेरिएंटमध्ये क्रोम्ड फ्रंट बंपर एक्स्टेंडर,ब्लॅक आणि क्रोम रिअर स्किड प्लेट, प्रीमियम बॉडी कव्हर, कार केअर किट, प्रीमियम डोअर वायजर, फ्रंट स्किड गार्निश,ब्लॅक गार्निशसह आउटसाइड रिअर व्ह्यू मिरर, ब्लॅक गार्निश केलेले हेडलॅम्प, क्रोम बॉडी साइड मोल्डिंग, स्मोक्ड क्रोम गार्निश टेललॅम्प, क्रोम बॅक डोअर गार्निश, ऑल वेदर 3डी मॅट्स, इंटिरियर स्टाइलिंग किट, ब्लॅक नेक्सा कुशन्स, डोअर सील गार्ड, ट्रंक सील लोडिंग प्रोटेक्शन आणि 3D बूट मॅट आणि साइड स्टेप्स सारखे फिचर्स आहेत.
अल्फा आणि झेटा व्हेरिएंटमध्ये काय आहे खास?
मारुती सुझुकी ग्रँड विटारा डोमिनियन एडिशनच्या अल्फा व्हेरियंटमध्ये दिलेले सर्व फिचर्स यामध्येदेखील आहेत, परंतु यात साइड स्टेप्स नाहीत. तथापि, यात तपकिरी रंगाचे फिनिश असलेले प्रीमियम सीट कव्हर आहे. या व्हेरिएंटच्या ऍक्सेसरी पॅकेजची किंमत ४९,९९९ रुपये आहे.
तर, मारुती सुझुकी ग्रँड विटारा डोमिनियन एडिशनच्या डेल्टा ट्रिममध्ये ‘झेटा ट्रिम साइड स्टेप’ आणि ‘ब्राऊन फिनिशिंगचे प्रीमियम सीट कव्हर’ नाहीत. मात्र, यात एनिग्नेटिक लाइन्ससह ड्युअल टोन सीट कव्हर देण्यात आले आहे. या व्हेरिएंटच्या ऍक्सेसरी पॅकेजची किंमत ४८,५९९ रुपये आहे. सणासुदीच्या काळात ग्राहकांना मारुती सुझुकी ग्रँड विटारा वर १ लाख रुपयांपर्यंतचा फायदा मिळू शकतो.