Maruti Suzuki Price Hike: मारुती सुझुकी कंपनीची कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. कारण कंपनीने त्यांच्या सर्व कारच्या किंमतींत वाढ करण्याची घोषणा केली आहे. मारुतीने सर्व मॉडेलच्या एक्स शोरुम किंमतींमध्ये १.१ टक्क्यांची वाढ केली असून या नव्या किंमती आजपासूनच म्हणजेच १६ जानेवीपासूनच लागू होणार आहेत. या वाढलेल्या किमती कंपनीच्या सध्याच्या कारच्या २०२३ मॉडेलवर लागू होतील. मारुती सुझुकी कडून २०२३ मधील ही पहिलीच दरवाढ आहे, याआधी कंपनीने २०२२ मध्ये आपल्या कारच्या किमतीत तीनदा वाढ केली आहे.
दरवाढ करण्याचे कारण काय?
कंपनीने म्हटल्याप्रमाणे सर्व क्षेत्रात वाढलेल्या महागाईमुळे वाहनांच्या निर्मितीसाठी लागणारा खर्च म्हणजेच इनपुट कॉस्ट वाढली आहे. यामुळे कंपनी पुन्हा एकदा त्यांच्या कारच्या किंमती वाढवत आहे. मारुती सुझुकीने आपल्या सर्व कारच्या किंमतीत वाढ केली आहे. या वाढीमागे Inflation आणि Regulatory requirements हे दोन कारणे सांगितली आहेत. गेल्या दोन वर्षांपासून कंपन्या मोठ्या प्रमाणावर वाहनांच्या किंमती वाढवत आहेत. सेमीकंडक्टरचा पुरवठा, पुरवठा साखळी, इंधन दरवाढ, पगारवाढ, महागाई आदी कारणेही वाहनांच्या किमतीत वाढ होण्याचे प्रमुख कारण आहेत. अद्याप कोणत्या मॉडेलची किंमत किती वाढवली जाणार आहे, याबद्दल कोणतीही माहिती कंपनीने दिलेली नाही.
(हे ही वाचा : Auto Expo 2023: Maruti Suzuki Jimny 5 door लाँच; पाहा कशी दिसते ही आकर्षक कार, ‘इतक्या’ रुपयांत करा बुकिंग)
मारुती सुझुकीने २०२२ मध्ये कारच्या किमती तीन वेळा वाढवल्या
मारुती सुझुकीने २०२२ मध्ये आपल्या कारच्या किमतीत तीन वेळा वाढ केली होती, पहिली वाढ जानेवारी २०२२ मध्ये, दुसरी वाढ एप्रिल २०२२ आणि जुलै २०२२ मध्ये केली होती. मारुतीच्या गाड्यांमध्ये ४.३ टक्के वाढ झाली असून त्यात मारुतीच्या कार खरेदी करणे सुमारे ६,००० रुपयांनी महागले आहे.
मारुती सुझुकी दरवाढीचे संकेत डिसेंबर २०२२ मध्येच दिले
मारुती सुझुकीने डिसेंबर २०२२ मध्येच नवीन वर्षात किंमत वाढवण्याचे संकेत दिले होते, ज्यामध्ये कंपनीने म्हटले होते की, Inflation आणि Regulatory requirements मुळे कारची इनपुट किंमत वाढू शकते. कंपनीने असेही म्हटले होते की, या गाड्यांच्या किमती काही प्रमाणात वाढवल्या जातील.