Maruti Chepaest 7 Seater car: मारुती सुझुकीने मार्च विक्रीचे निकाल जाहीर केले आहेत, यावेळी पुन्हा कंपनीची सर्वात स्वस्त ७ सीटर कार ‘Eeco’ ची जोरदार विक्री झाली आहे. मारुती स्विफ्ट (१७,५५९ युनिट), मारुती वॅगनआर (१७,३०५ युनिट), मारुती ब्रेझा (१६,२२७ युनिट), मारुती बलेनो (१६,१६८ युनिट), टाटा नेक्सान (१४,७६९ युनिट्स) टॉप-१० बेस्ट सेलिंग कारच्या यादीत मार्च २०२३ ), ह्युंदाई क्रेटा (१४,०२६ युनिट्स), मारुती डिझायर (१३,३९४ युनिट्स), मारुती इको (११,९९५ युनिट्स), टाटा पंच (१०,८९४ युनिट्स) आणि मारुती सुझुकी ग्रँड विटारा (१०,०४५ युनिट्स). मारुती Eeco विक्रीच्या बाबतीत आठव्या क्रमांकावर आहे आणि टाटा पंच नवव्या क्रमांकावर आहे. Maruti Suzuki ची सर्वात कमी किंमतीची ७ सीटर कार Maruti Eeco देशात सर्वात जास्त विकणारी कार बनली आहे. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Maruti Eeco किंमत

मारुती ईकोची सुरुवातीची किंमत ५.२५ लाख रुपये (एक्स शोरूम, दिल्ली) आहे. ही किंमत टॉप मॉडलमध्ये ६.२५ लाख रुपये पर्यंत जाते. मारुती सुझुकी ईकोचे चार ट्रिम्स मध्ये उपलब्ध आहे. ज्यात पहिले ५ सीटर स्टँडर्ड (ओ) दुसरे ५ सीटर एसी (ओ), तिसरे फाइव्ह सीटरचे एसी सीएनजी (ओ) आणि चौथे ७ सीटरचे स्टँडर्ड (ओ) आहे.

(हे ही वाचा : कार, बसमधून प्रवास करताना तुम्हालाही उलट्या होतात का? करा ‘हे’ सोपे उपाय, प्रवास होईल आनंदात )

Maruti Eeco इंजिन

मारुती सुझुकी Eeco कंपनीने तेरा वर्षांपूर्वी बाजारात लॉन्च केली होती आणि तेव्हापासून या कारने बाजारात आपली एक वेगळीच पकड बनवली आहे. मारुती ईको नेहमीच त्याच्या सेगमेंटमध्ये आघाडीवर राहिली आहे. या गाडीचा व्यावसायिक वापर मोठ्या प्रमाणात होतो. मारुती ईकोमध्ये मिळणारे इंजिन ११९७ सीसीचे १.२ लीटर पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन ८१ पीएसचे पॉवर आणि १०४.४ एनएमचे पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिन सोबत कंपनीने स्पीड मॅन्यूअल ट्रान्समिशनशी जोडले आहे.

Maruti Eeco चे मायलेज
मारुती सुझुकीची दावा आहे की, पेट्रोल वर ईकोचे मायलेज १९.७१ किमी प्रति लीटर आहे. सीएनजी वर हे मायलेज २६.७८ किमी प्रति किलो आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maruti suzuki has announced its march sales results this time again the companys cheapest 7 seater car eeco has been sold fiercely pdb