देशात अशी काही कार्स आहेत,जी वर्षानुवर्षे लोकांच्या मनात घर करून असतात. याचे एक कारण आहे, ते म्हणजे परफॉर्मन्स असो, मायलेज असो किंवा स्पेस असो, कोणत्याही बाबतीत या कार आपल्या ग्राहकांना निराश करत नाही. देशातील सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकी अशा कार बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे. हीच कंपनी आहे जी तिच्या विश्वसनीय कारच्या आधारे सर्वाधिक कार विकते. मारुती सुझुकी गेल्या १५ वर्षांपासून अशीच एक आलिशान सेडान कार बनवत आहे आणि आजही लोक त्या कारसाठी वेडे झाले आहेत. कामगिरीसोबतच ही सेडान उत्कृष्ट मायलेज आणि उत्कृष्ट वैशिष्ट्यांसह देखील येते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मारुतीच्या ‘या’ कारचा देशभरात जलवा

आज आपण मारुती सुझुकी डिझायर बद्दल बोलत आहोत. डिझायरने आता असे काही केले आहे जे इतर कोणत्याही सेडानला करणे शक्य वाटत नाही. वास्तविक, डिझायरने २५ लाख युनिट्सच्या विक्रीचा आकडा पार केला आहे. इतर कारबद्दल बोलायचे झाले तर, आजपर्यंत कोणत्याही सेडानने १० लाखांच्या विक्रीचा आकडाही गाठलेला नाही.

कंपनीचे सीईओ, मार्केटिंग आणि सेल्स शशांक श्रीवास्तव यांनी यावेळी सांगितले की, कंपनीचे अद्ययावत तंत्रज्ञान, उत्तम वैशिष्ट्ये आणि नवीन डिझाइनसह दर्जेदार उत्पादने लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. डिझायर ही कंपनीची एक उत्तम कार आहे आणि ग्राहकांनी तिच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांचे आभारी आहोत. २५ लाखांची मने जिंकणे ही महत्त्वाची कामगिरी असल्याचे, ते म्हणाले.

(हे ही वाचा : भारतीय ग्राहक सर्वाधिक खरेदी करतायत ‘या’ २५ कार, पाहा संपूर्ण यादी )

मारुती डिझायर कंपनीने २००८ मध्ये ही कार लाँच केली होती. यानंतर या कारने एकाच वर्षात १ लाखांचा विक्रीचा टप्पा पार केला. २०१२-१३ मध्ये ५ लाख युनिट्स, २०१५-१६ मध्ये १० लाख युनिट्स, २०१७-१८ मध्ये १५ लाख युनिट्स आणि २०१९-२० मध्ये २० लाख युनिट्सच्या विक्रीचे आकडे गाठले. जर आपण या वर्षाबद्दल बोललो तर ऑगस्टमध्ये कारच्या १३,२९३ युनिट्सची विक्री झाली. देशातील सर्वाधिक विकल्या जाणार्‍या सेडान आणि सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारच्या यादीत ते ७ व्या क्रमांकावर आहे.

किंमत

कंपनी डिझायरमध्ये १.२ लीटर पेट्रोल इंजिन देते. तुम्ही सीएनजी पर्यायातही कार खरेदी करू शकता. कारच्या मायलेजबद्दल बोलायचे झाले तर, पेट्रोलवर ती सरासरी २५ किमी प्रति लिटर आणि सीएनजीवर ३४ किमी प्रति किलो मायलेज देते. तुम्हाला कोणत्याही हॅचबॅकपेक्षा कमी किमतीत डिझायर मिळेल. कारच्या सुरुवातीच्या व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत ६.५२ लाख रुपये आहे. त्याचा टॉप व्हेरिएंट खरेदी करण्यासाठी तुम्हाला ९.३९ लाख रुपये एक्स-शोरूम किंमत मोजावी लागेल.