Maruti Suzuki Pending Order: मारुती सुझुकी ही देशातील सर्वात मोठी कार विकणारी कंपनी आहे. कंपनीच्या अल्टोपासून वॅगनआर आणि स्विफ्टपर्यंतच्या गाड्यांना मागणी खूप आहे. दर महिन्याला सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारच्या यादीत हेच नाव कायम आहे. मात्र कंपनीची दोन वाहने अशी आहेत ज्यासाठी लाखो ग्राहक प्रतीक्षा करीत आहेत. मारुती सुझुकीने अलीकडेच त्यांच्या कारच्या प्रलंबित ऑर्डरची आकडेवारी जाहीर केली आहे, ज्यामध्ये मारुती एर्टिगा आणि डिझायरसाठी सर्वाधिक प्रलंबित ऑर्डर आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी इंडियाकडे सध्या ३८०,००० बुकिंग प्रलंबित आहेत. यापैकी सर्वाधिक प्रलंबित ऑर्डर्स Ertiga, Dzire, Grand Vitara, Jimny, Baleno, Franks आणि XL6 साठी आहेत.

(हे ही वाचा : Brezza ची बोलती बंद करायला टाटा आणतेय नव्या अवतारात Compact SUV, फीचर्स जाणून उडतील होश )

१ लाख प्रलंबित ऑर्डर

कंपनीकडे मारुती सुझुकी एर्टिगासाठी सर्वाधिक प्रलंबित ऑर्डर आहेत. कंपनीच्या म्हणण्यानुसार, एर्टिगासाठी सुमारे १००००० बुकिंग प्रलंबित आहेत, त्यानंतर मारुती सुझुकी डिझायर कॉम्पॅक्ट सेडान आणि मारुती सुझुकी ग्रँड विटारा मध्यम आकाराच्या एसयूव्हीसाठी अनुक्रमे ४०,००० आणि ३४,००० बुकिंग प्रलंबित आहेत.

5-दरवाजा जिमनी SUV, जी या महिन्याच्या शेवटी लाँच होण्याची शक्यता आहे, त्याला २४,५०० बुकिंग मिळाले आहेत. तर मारुती सुझुकी फ्रँक्सला आतापर्यंत १६,५०० बुकिंग मिळाले आहेत. मारुती या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात फ्रँक्सच्या किमती जाहीर करेल. लोकप्रिय मारुती सुझुकी बलेनो प्रीमियम हॅचबॅकचे २०,००० बुकिंग प्रलंबित आहेत. कंपनीच्या प्रीमियम MPV मारुती सुझुकी XL6 चे ९,००० बुकिंग प्रलंबित आहेत.

मारुती कारसाठी प्रतीक्षा कालावधी

मारुती कारसाठी जास्तीत जास्त प्रतीक्षा कालावधी बद्दल बोलायचे तर, मारुती सुझुकी एर्टिगा साठी ३३-३४ आठवडे, मारुती सुझुकी ब्रेझासाठी २१-२२ आठवडे, मारुती सुझुकी डिझायरसाठी २०-२१ आठवडे, मारुती सुझुकीसाठी १६-१७ आठवडे, ग्रँड विटारासाठी १६-१७ आठवडे आणि XL6 हे १४-१५ आठवडे आहे.