Maruti Suzuki Grand Vitara New Price List: मारुती सुझुकी ग्रँड विटारा एसयूव्ही महाग झाली आहे. मारुती सुझुकीने प्रीमियम डीलरशिप Nexa वर विकल्या जाणाऱ्या या सर्वोत्कृष्ट मायलेज SUV ची किंमत ३०,००० रुपयांपर्यंत वाढवली आहे. अशा परिस्थितीत ग्रँड विटाराची किंमत १०.७० लाख रुपयांपासून सुरू होत आहे. बेस मॉडेल सिग्मा १.५ MT च्या किंमतीत २५,००० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. मारुती ग्रँड विटाराच्या अनेक व्हेरियंटच्या किमतीत केवळ २ हजार रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. जर तुम्हीही या महिन्यात म्हणजेच एप्रिलमध्ये मारुती सुझुकी ग्रँड विटारा खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आधी जाणून घ्या की या एसयूव्हीसाठी तुम्हाला आता किती पैसे द्यावे लागतील?
मारुती ग्रँड विटाराच्या माइल्ड हायब्रीड प्रकारांच्या किमती
मारुती सुझुकीने ग्रँड विटाराच्या सिग्मा Sigma 1.5 MT च्या किमतीत २५ हजार रुपयांनी वाढ केली असून, त्यानंतर त्याची किंमत १०.७० लाख रुपये झाली आहे.
- Delta 1.5 MT ची किंमत २० हजार रुपयांनी वाढून १२.१० लाख रुपये झाली आहे.
- Zeta 1.5 MT ची किंमत २ हजार रुपयांनी वाढून १३.९१ लाख रुपये झाली आहे.
- Alpha 1.5 MT ची किंमत २ हजार रुपयांनी वाढून १५.४१ लाख रुपये झाली आहे.
- Alpha 1.5 MT DT २ हजार रुपयांनी वाढून १५.५७ लाख रुपये झाले आहे.
- Alpha 4WD 1.5 MT ची किंमत २ हजार रुपयांनी वाढून १६.९१ लाख झाली आहे.
- Alpha 4WD 1.5 MT DT ची किंमत २,००० रुपयाने वाढून १७.०७ लाख झाली आहे.
- Delta 1.5 ATची किंमत २० हजार रुपयांनी वाढून १३.६० लाख रुपये झाली आहे.
- Zeta 1.5 AT ची किंमत २ हजार रुपयांनी वाढून १५.४१ लाख रुपये झाली आहे.
- Alpha 1.5 AT ची किंमत २,००० रुपयांनी वाढली आहे आणि आता ती १६.९१ लाख रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहे.
- Alpha 1.5 AT DT व्हेरियंटची किंमत २ हजार रुपयांनी वाढून १७.०७ लाख रुपये झाली आहे.
(हे ही वाचा: Hyundai च्या ग्राहकांना दणका! कंपनीने ‘या’ चार पॉप्यूलर कारच्या किमतीत केली वाढ, पाहा नव्या किमती)
मारुती सुझुकी ग्रँड विटारा स्ट्रॉंग हायब्रिड आणि सीएनजी प्रकारांच्या किमती
- मारुती सुझुकीने Grand Vitara च्या Strong Hybrid Zeta+ 1.5 CVT ची किंमत ३० हजार रुपयांनी वाढवली आहे, त्यानंतर ती १८.२९ लाख रुपये झाली आहे.
- Strong Hybrid Zeta+ 1.5 CVT DT व्हेरियंटची किंमत ३० हजार रुपयांनी वाढून १८.४५ लाख रुपये झाली आहे.
- Strong Hybrid Alpha+ 1.5 CVT प्रकाराची किंमत 30 हजार रुपयांनी वाढून 19.79 लाख रुपये झाली आहे.
- Strong Hybrid Alpha+ 1.5 CVT DT व्हेरियंटची किंमत 30 हजार रुपयांनी वाढून 19.95 लाख रुपये झाली आहे.
- डेल्टा CNG 1.5 MT प्रकारची किंमत 20 हजार रुपयांनी वाढून 13.05 लाख रुपये झाली आहे.
- Zeta CNG 1.5 MT प्रकारची किंमत 2,000 रुपयांनी वाढून 14.86 लाख रुपये झाली आहे.
या सर्व एक्स-शोरूम, दिल्लीच्या किमती आहेत.