देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी भारतात ४० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आनंद साजरा करत आहे. मारुती सुझुकी ही एक वाहन उत्पादक कंपनी आहे. ही कंपनीं आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन मॉडेल्स भारतीय बाजारपेठेमध्ये लॉन्च करत असते. अपडेटेड मॉडेल, अनेक नवीन फीचर्स असलेली मॉडेल कंपनी लॉन्च करत असते. ४० वर्षे पूर्ण झाल्याची आठवण म्हणून कंपनीने आपल्या एरिना लाइनअपमध्ये कार्सची ब्लॅक एडिशन सिरीज लॉन्च केली आहे.
मारुतीने लॉन्च केलेल्या ब्लॅक एडिशन सिरीजमध्ये अल्टो अल्टो K10, S-Presso, Celerio, WagonR. , Swift, Dzire, Brezza आणि Ertiga या कारचा समावेश असणार आहे. मारुती सुझुकी ब्लॅक एडिशनमधील कार्स कंपनीने पर्ल मिडनाईट ब्लॅक केरळमध्ये लॉन्च केल्या आहेत. यासोबतच मारुती सुझुकी या ब्लॅक एडिशन कारसाठी मर्यादित एडिशन अॅक्सेसरीजचे पॅकेजदेखील लॉन्च करण्यात आले आहे.
स्पेशल एरिना ब्लॅक एडिशन Alto K10, S-Presso, Celerio, WagonR, Swift, Dzire, Brezza आणि Ertiga टॉपच्या दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असणार आहेत. कार्सच्या एरिना ब्लॅक एडिशन सिरींजची किंमत एरिना कार्सच्या आताच्या किंमती एवढीच असणार आहे.
मारुती सुझुकी ब्लॅक एडिशन कारबद्दल बोलताना मारुती सुझुकीचे सीईओ (मार्केटिंग अँड सेल्स ) म्हणाले की, आम्ही आमच्या ग्राहकांसाठी एरिना ब्लॅक लिमिटेड एडिशन लॉन्च केली आहे याचा आम्हाला आनंद आहे. याशिवाय ग्राहक त्यांच्या ब्लॅक लिमिटेड एडिशन कार्सचे स्वरूप आणखी अनुकूल करण्यासाठी तुम्ही जनमन अॅक्सेसरीजची निवड करू शकतात असे शशांक श्रीवास्तव म्हणाले. आम्हाला विश्वास आहे की, ग्रहक या नवीन डिझाईनमध्ये आमच्या प्रिय एरिना मॉडेल्सचे कौतुक करतील.