Maruti Suzuki Fronx Launched: भारतातील सर्वात मोठ्या कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी इंडियाने, ऑटो एक्स्पो २०२३ मध्ये FRONX चे अनावरण केले होते. Fronx ही बॅलेनो हॅचबॅकवर आधारित आहे आणि ती क्रॉसओवर SUV आहे, जी देशातील SUV ट्रेंडला एनकॅश करते. आता मारुती सुझुकी फ्राँक्स लाँच करण्यात आले असून त्याच्या किमतीचा खुलासा करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंजिन आणि सुरक्षा

Fronx SUV  दोन पेट्रोल इंजिनांसह येते. पहिले इंजिन १.२-लिटर, नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल आहे आणि दुसरे १.०-लिटर ‘बूस्टरजेट’ टर्बो-पेट्रोल आहे. भारतातील २०१७ बलेनोसह ते डेबिट झाले आणि टॉप-स्पेस Baleno RS सह ऑफर करण्यात आले. फ्रॉन्क्सवर, हे इंजिन १००hp आणि १४७.६Nm टॉर्क निर्माण करते. हे पाच-स्पीड मॅन्युअल आणि सहा-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्स (पॅडल शिफ्टर्ससह) च्या पर्यायासह दिले जाते. फ्रॉन्क्स सुझुकीच्या हार्टेक्ट प्लॅटफॉर्मवर तयार केले आहे.

(हे ही वाचा : मारुतीच्या ‘या’ ५ सीटर कारची तुफान मागणी पाहून Creta-Seltos ची उडाली झोप, १.४० लाख ग्राहक रांगेतच!)

वैशिष्ट्ये

टॉप-स्पेक व्हेरियंटमध्ये ९.०-इंच SmartPlay Pro+ टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम (खालच्या व्हेरिएंटमध्ये ७.०-इंच स्क्रीन), वायरलेस Android Auto आणि Apple CarPlay, वायरलेस फोन चार्जर मिळतो. याशिवाय, हेड-अप डिस्प्ले, ३६०-डिग्री कॅमेरा, क्रूझ कंट्रोल, कनेक्टेड कार तंत्रज्ञान, उंची-अ‍ॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट आणि मागील एसी व्हेंट्स यांचाही समावेश आहे. सुरक्षिततेसाठी, सहा एअरबॅग्ज, ESP आणि हिल होल्ड असिस्ट उपलब्ध आहेत.

किंमत

कंपनीने जानेवारीपासूनच फ्राँक्सचे बुकिंग सुरू केले आहे. मारुती सुझुकीच्या प्रिमियम डीलरशिप नेक्साद्वारे ग्राहक फ्रॉन्क्स एसयूव्ही ११ हजार रुपयांमध्ये बुक करू शकतात. आतापर्यंत कंपनीला २० हजारांहून अधिक बुकिंग मिळाले आहेत. फ्राँक्सला ७.४६ लाख रुपये किंमतीच्या सुरुवातीच्या एक्स शोरूम किंमतीत लाँच करण्यात आले आहे. तर टॉप मॉडेलची किंमत १२.९७ लाख रुपये (सर्व किमती, एक्स-शोरूम) आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maruti suzuki has launched the much awaited fronx suv at a starting price of rs 7 46 lakh for the base sigma variant pdb
Show comments