Maruti Suzuki Has Over 4 Lakh Orders Pending Delivery: गेल्या काही काळापासून कारच्या विक्रीत सकारात्मक वाढ झाली आहे. बर्याच कार उत्पादकांकडे मोठ्या प्रमाणात बुकिंग असते परंतु विविध कारणांमुळे ते वेळेवर डिलिव्हरी करू शकत नाहीत. देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीकडे देखील कारसाठी लाखो बुकिंग आहेत, जे अद्याप प्रलंबित आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रलंबित बुकिंगशी संबंधित माहिती देताना, मारुतीचे कार्यकारी संचालक (कॉर्पोरेट नियोजन आणि सरकारी व्यवहार) राहुल भारती म्हणाले की, कंपनीकडे सुमारे ४,१२००० युनिट्सची ऑर्डर आहे. सुमारे एक तृतीयांश ऑर्डर सीएनजी कारसाठी आहेत.
मारुतीने लाँच केलेल्या नवीन एसयूव्हीचे बुकिंगही चांगले असल्याचे त्यांनी सांगितले. राहुल भारतीच्या विधानानुसार, आमचा अंदाज आहे की, मारुतीकडे सुमारे १.४ लाख युनिट्सच्या सीएनजी कारच्या ऑर्डरचा अनुशेष आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मारुतीने गेल्या आर्थिक वर्षात सुमारे ३.३ लाख सीएनजी कार विकल्याचा खुलासा केला. १३ सीएनजी मॉडेल्ससह सीएनजी स्पेसमध्ये मारुतीचा सर्वात मोठा वाटा आहे. आता कंपनी CNG SUV, Brezza चे CNG व्हर्जन आणि ग्रँड विटारा देखील विकत आहे.
(हे ही वाचा: देशात महिंद्राच्या ‘या’ ७-सीटर कारची धूम, अख्खा देश पडला प्रेमात, ग्राहकांकडून बंपर खरेदी, किंमत…)
Maruti Suzuki Jimny 5-door SUV
मारुती सुझुकी लवकरच Jimny 5-door SUV लाँच करणार आहे, कंपनीने त्याच्या गुडगाव प्लांटमध्ये जिमनी 5-दरवाजा SUV चे मालिका उत्पादन देखील सुरू केले आहे. मारुती सुझुकी जिमनी जून २०२३ मध्ये लाँच होणार आहे. २०२३ च्या ऑटो एक्स्पोमध्ये हे सादर करण्यात आले होते आणि तेव्हापासून बुकिंग सुरू झाले होते. कंपनीला यासाठी २५,००० हून अधिक बुकिंग मिळाले आहेत. मॅन्युअल आवृत्तीसाठी सुमारे ६ महिन्यांचा प्रतीक्षा कालावधी आहे तर स्वयंचलित आवृत्तीसाठी सुमारे ७-८ महिन्यांचा प्रतीक्षा कालावधी आहे.