Maruti Suzuki ही लोकप्रिय वाहन उत्पादक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन मॉडेल्स लॉन्च करत असते. या कंपनीने आता एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. कंपनीने देशातील सर्वात स्वस्त कार Alto ८०० हे मॉडेल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. रिपोर्टनुसार , मारुती सुझुकी इंडियाने त्यांचे एंट्री लेव्हल मॉडेल अल्टो ८०० मॉडेल बंद केले आहे. कंपनीने या लोकप्रिय हॅचबॅकचे उत्पादन थांबवले आहे. कंपनी आता केवळ स्टॉकमधील उर्वरित युनिट्स विकू शकणार आहे.
काय आहे कारण ?
माहितीनुसार सेगमेंटमधील कमी विक्री आणि १ एप्रिलपासून लागू होणारे BS6 फेज 2 नियम हेच ही एंट्री लेव्हल हॅचबॅक बंद करण्याचे कारण आहे. कमी विक्री होत असल्यामुळे अल्टो ८०० ला अपग्रेड करणे हे योग्य नसेल. आर्थिक वर्ष २०१६ मध्ये या गाडीच्या ४,५०,००० युनिट्सची विक्री झाली होती. तर २०२३ मध्ये २,५०,००० युनिट्सने कमी झाले आहे. याबबातचे वृत्त इंडिया टूडेने दिले आहे.
मारुती सुझकी अल्टो ८०० ला २००० साली भारतामध्ये लॉन्च करण्यात आले होते. मारुतीने २०१० पर्यंत या मॉडेलच्या १८,००,००० युनिट्सची विक्री केली होती. अल्टो के १० २०१० मध्ये लॉन्च झाली. २०१० पासून आतापर्यंत कंपनीने अल्टो ८०० ची १७,००,००० आणि अल्टो के १० ची ९,५०,००० युनिट्सची विक्री केली आहे.
फीचर्स आणि किंमत
अल्टो ८०० मध्ये ७९६ सीसीचे पेट्रोल इंजिन येते. जे ४८PS ची पॉवर आणि ६९ एनएम इतके पीक टॉर्क जनरेट करते. यामध्ये वापरकर्त्यांना सीएनजीचा पर्यायही उपलब्ध आहे. या मॉडेलमध्ये ५ -स्पीड मॅन्युअल हा एकमेव ट्रान्समिशन पर्याय उपलब्ध आहे.
मारुतीच्या अधिकृत वेबसाइटनुसार अल्टो ८०० ची किंमत ही ३.५४ लाख रुपये ते ५.१३ लाख रुपयांच्यामध्ये आहे . हे मॉडेल कंपनीने बंद केल्यामुळे कंपनीचे सर्वात स्वस्त मॉडेल आता अल्टो के १० असणार आहे. अल्टो के १० मॉडेलची किंमत ३. ९९ लाख ते ५.९४ लाख रुपयांमध्ये असणार आहे.