Maruti Suzuki India Has Over 3.2 Lakh Pending Orders: मारुती सुझुकी ही भारतातील सर्वात मोठी कार विकणारी कंपनी आहे आणि दरमहा लाखो वाहनांची विक्री करते. मारुती कंपनीच्या कार लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. मार्केटमध्ये मारुती सुझुकी कंपनीच्या कार सर्वाधिक विकल्या जात आहेत. या गाड्यांची खासियत म्हणजे त्यांचे मायलेज आणि किंमत आहे. कमी किमतीमध्ये सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कार म्हणून मारुती सुझुकीच्या गाड्यांना ओळखले जाते. भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीकडे सध्या ३.२ लाख कारच्या ऑर्डर प्रलंबित आहेत. मारुती सुझुकी इंडियाचे वरिष्ठ कार्यकारी संचालक (विपणन आणि विक्री) शशांक श्रीवास्तव यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.
शशांक श्रीवास्तव म्हणाले, सध्या मारुती सुझुकीकडे सुमारे ३.२ लाख ऑर्डर प्रलंबित आहेत, ज्यामध्ये ब्रेझाचे १४ हजार, फ्रंटेक्सचे २० हजार, जिमनीचे १० हजार, ग्रँड विटाराचे २२ हजार आणि इन्व्हिक्टोचे ७ हजार प्रलंबित ऑर्डर आहेत. मारुती SUV सेगमेंटमध्ये देखील चांगली कामगिरी करत आहे, त्याच्या Brezza, FrontX, Jimny आणि Grand Vitara ला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
(हे ही वाचा: बाकी कंपन्यांची उडाली झोप, Jawa च्या दोन बाईक नव्या अवतारात देशात दाखल, पाहा किंमत )
ग्रँड विटारा बाजारात लाँच होऊन फक्त एक वर्ष झाले आहे आणि ती देशातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या एसयूव्हींपैकी एक बनली आहे. ऑगस्टमध्ये ११,८१८ युनिट्सची विक्री करून ही पाचवी सर्वाधिक विक्री होणारी SUV होती. एवढेच नाही तर एका वर्षापेक्षा कमी कालावधीत १ लाख विक्रीचा टप्पा गाठणारी ग्रँड विटारा मिड-एसयूव्ही सेगमेंटमधील सर्वात वेगवान एसयूव्ही बनली आहे.
श्रीवास्तव म्हणाले, “चार दशकांहून अधिक काळ, मारुती सुझुकी ऑटोमोटिव्ह उद्योगात आघाडीवर आहे. गेल्या वर्षी ग्रँड विटारा लाँच झाली अन् ग्रँड विटाराने मारुती सुझुकीच्या एसयूव्ही सेगमेंटमधील वाढीला गती दिली. मारुती सुझुकी आज SUV सेगमेंटमध्ये २२ टक्के मार्केट शेअरसह नंबर १ आहे. लाँच झाल्यापासून अवघ्या बारा महिन्यांत, ग्रँड विटाराने एक लाखाहून अधिक ग्राहकांचे प्रेम जिंकून एक प्रभावी कामगिरी केली आहे,” असेही ते म्हणाले.