Maruti Suzuki Recalls 7,213 Vehicles: देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीच्या ग्राहकांसाठी एक मोठी बातमी आहे. कंपनीची लोकप्रिय कार मारुती सुझुकी बलेनो आरएस एडिशन (मारुती सुझुकी बलेनो आरएस) च्या ब्रेक फंक्शनमध्ये मदत करणाऱ्या व्हॅक्यूम पंपमध्ये खराबी आढळून आली आहे. हे पाहता कंपनी या गाड्यांचे ७,२१३ युनिट्स परत मागवत आहे. याशिवाय, कंपनी आपली MUV Ertiga आणि XL6 देखील परत मागवणार आहे.

२०१६ आणि २०१९ दरम्यान तयार केलेल्या कारमध्ये आढळला दोष

मारुती सुझुकी इंडियाने सांगितले की ते बलेनो आरएस मॉडेलचे ७,२१३ युनिट्स परत मागवत आहेत. या कारच्या व्हॅक्यूम पंपमध्ये (ब्रेक फंक्शनला मदत करणारा भाग) दोष असल्याचा कंपनीला संशय आहे. कंपनीने स्टॉक एक्स्चेंजला सांगितले की २७ ऑक्टोबर २०१६ ते १ नोव्हेंबर २०१९ दरम्यान निर्मित या मॉडेलची वाहने परत मागवली जातील.

Maruti Suzuki First electric car e Vitara
e Vitara: मारुती सुझुकीची पहिली इलेक्ट्रिक कार! ऑटो एक्स्पो २०२५ मध्ये करणार लाँच; पण, किंमत काय असणार
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
New Honda Dio 2025
New Honda Dio 2025 : ७५ हजारांमध्ये लाँच झाली नवीन होंडा डियो; जाणून घ्या, काय आहेत नवीन फीचर्स
Renault Triber Discount On 63,000 Rupees In January 2025 Check Specification & Features Details
नवीन कार घेण्याचा विचार करताय? या ७ सीटर कारवर मिळत आहे मोठी सूट; आत्ताच खरेदी केल्यास होईल ६३,००० रुपयापर्यंतचा फायदा
remarkable Performance of Auto Industry in 2024
अडीच कोटी वाहनांची वर्षभरात विक्री; ‘सियाम’ची आकडेवारी; २०२३ च्या तुलनेत १२ टक्क्यांची वाढ
Mercedes Benz India sales news in marathi
भारतात गाड्यांच्या विक्रीत दोन लाखांचा टप्पा; मर्सिडीज बेंझचा ‘आलिशान’ वरचष्मा कायम 
New Car Launch Tata launches Tiago and Tigor in 2025
५ लाखांत टाटाने लाँच केली नवी कार! अपडेटेड Tiago आणि Tigor चे फीचर्स एकदा बघाच; थेट Marutiला देत आहे टक्कर
Mercedes Benz crosses 2 lakh car sales print eco news
‘मर्सिडीज बेंझ’कडून दोन लाख मोटारींची विक्री; ‘मर्सिडीज बेंझ’कडून दोन लाख मोटारींच्या विक्रीचा टप्पा सर

(हे ही वाचा : ५.९९ लाखाची ‘ही’ सर्वात स्वस्त SUV कंपनीसाठी ठरली गेम चेंजर, Tata Punch, Renault Kiger चं संपवलं वर्चस्व? )

कारमध्ये कोणता आढळला दोष?

मारुती सुझुकी इंडियाने सांगितले की, “ब्रेक फंक्शनला मदत करणाऱ्या व्हॅक्यूम पंपमध्ये काही बिघाड झाल्याचा संशय आहे. प्रभावित वाहनाला ब्रेक पेडल दाबण्यातही अडचण येऊ शकते.” कंपनीने म्हटले आहे की प्रभावित वाहनांच्या मालकांना मारुती सुझुकीच्या अधिकृत डीलर वर्कशॉपमधून दोषपूर्ण भाग बदलण्याची माहिती मिळेल. हे विनामूल्य बदलले जातील.

Ertiga आणि XL6 मध्ये देखील समस्या

कंपनीने आपल्या वेबसाइटवरील एका पोस्टमध्ये असेही म्हटले आहे की, ती २४ जून २०२२ ते ७ जुलै २०२२ दरम्यान निर्मित Ertiga आणि XL6 मॉडेल्सच्या ६७६ वाहनांसाठी सेवा मोहीम देखील राबवणार आहे, ज्यांच्या फ्रंट ड्राईव्हशाफ्टमध्ये दोष असल्याचा संशय आहे. एअरबॅग कंट्रोलरमध्ये दोष आढळल्याने या वर्षी जानेवारीमध्ये कंपनीने Alto K10, S-Presso, Eeco, Brezza, Baleno आणि Grand Vitara च्या १७,३६२ युनिट्स परत मागवल्या होत्या.

Story img Loader