Maruti Swift Hybrid Car and Maruti dzire Hybrid Car: कमी किमतीत जास्त मायलेज देणाऱ्या कार तुम्ही शोधत असाल तर तुमच्यासाठी आनंदीची बातमी आहे. देशातील दिग्गज कंपनी मारुती सुझुकी आता भारतीय ऑटो बाजारात Maruti Swift आणि Maruti Dzireचे हायब्रीड व्हेरियंट लाँच करणार आहे. जे ग्राहकांना अगदी कमी किमतीमध्ये जास्त मायलेज देणार आहे. मजबूत हायब्रिड तंत्रज्ञानामुळे, या दोन्ही कार सुमारे ४० किमी मायलेज देऊ शकतात. कंपनी पुढील वर्षी म्हणजेच २०२४ पर्यंत लाँच करण्याची तयारी करत आहेत.
Maruti Swift नेक्स्ट जनरेशन मॉडेलचे मायलेज
मारुती कंपनी २०२४ च्या पहिल्या सहामाहीत मारुती स्विफ्ट नेक्स्ट जनरेशन मॉडेल लाँच करू शकते. यात १.२ लीटर मजबूत हायब्रिड इंजिन पाहायला मिळेल. याला कंपनीने Z12E कोडनेम दिले आहे. सध्या ही कार K12C कोडनेमसह उपलब्ध आहे. कारबद्दल जाणून घेतल्यास, लोकांचा असा विश्वास आहे की हायब्रिड इंजिन फक्त टॉप व्हेरियंटमध्येच दिसेल. सध्या, मारुतीच्या ग्रँड विटारा, टोयोटा अर्बन क्रूझर हायराईडरमध्ये ही वैशिष्ट्ये आधीपासूनच उपलब्ध आहेत.
(हे ही वाचा : मारुतीच्या ‘या’ ५ सीटर कारकडे ग्राहकांनी फिरविली पाठ? मायलेज ३३ किमी, किंमत फक्त ५.५३ लाख )
सुझुकी आणि टोयोटा दोघेही त्यांचे तंत्रज्ञान एकमेकांशी शेअर करतात. म्हणजेच, या दोन्ही कंपन्यांच्या कारमध्ये तुम्हाला समान वैशिष्ट्ये पाहायला मिळतील. ही तंत्रे Hyride आणि Grand Vitara मध्ये दिसतात. या दोन्ही कार २७.९७ kmpl चा मायलेज देतात. काही लोक असाही अंदाज लावत आहेत की स्विफ्ट आणि डिझायर कमी वजनाव्यतिरिक्त मजबूत हायब्रिड आणि लहान आकारामुळे सुमारे ३५-४० Kmpl मायलेज देऊ शकतात. याबाबत अजून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
Maruti Swift आणि Maruti dzire किंमत
मारुती स्विफ्ट बद्दल बोलायचे झाले तर त्याची सुरुवातीची किंमत ५.९९-८.९८ लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते. दुसरीकडे, डिझायरची किंमत ६.४४ लाख रुपयांपासून सुरू होऊन ९.३१ लाख रुपयांपर्यंत असू शकते.