मारूती सुझुकी एक लोकप्रिय वाहन उत्पादक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी नवनवीन अपडेट आणि फीचर्स असलेले मॉडेल्स बाजारपेठांमध्ये लॉन्च करत असते. मारूती लवकरच एक नवीन कार लॉन्च करणार आहे. कंपनी आजवरची सर्वात मोठी कार मारूती सुझुकी Invicto लॉन्च करणार आहे. तर ही किती तारखेला लॉन्च होणार आहे याचे बुकिंग कधीपासून सुरू होणार आहे. हे जाणून घेऊयात.
मारूती लवकरच आपली सर्वात मोठी कार लॉन्च करणार आहे. कंपनी ही गाडी ६ जुलै रोजी ही कार भारतात लॉन्च केली जाणार आहे. लॉन्चिंग होण्यापूर्वी १९ जूनपासून कारच्या बुकिंगला सुरूवात होणार आहे. मारूती सुझुकी आणि टोयोटो यांच्या भागीदारीमध्ये तयार करण्यात आलेली ही चौथी कार असणार आहे. याबाबतचे वृत्त dnaindia ने दिले आहे.
Invicto ही नवीन कार टोयोटा इनोव्हा हायक्रॉस MPV आधारित असणार आहे. मारूती सुझुकीने या महिन्यात अधिकृतपणे कारच्या लॉन्चिंगबद्दल पुष्टी केली आहे. मात्र त्या आधी या कारबद्दल अनेक अफवा आणि इतर माहिती इंटरनेटवर प्रसिद्ध होत होती. Invicto ही कंपनीच्या ब्रँडचे पहिले मॉडेल असेल ज्याची किंमत २० लाखांपेक्षा जास्त असेल.
मारुतीने पुष्टी केली आहे की नवीन Invicto MPV टोयोटा इनोव्हा हायक्रॉसच्या 2.0-लिटर स्ट्राँग-हायब्रिड इंजिनद्वारे समर्थित असेल जे 183hp उत्पादन करते आणि ई-CVT ट्रांसमिशनशी जुळते. कंपनीने 2.0-लीटर पेट्रोल युनिट देखील ऑफर करणे अपेक्षित आहे जे 173hp बनवते. Invicto ही मारुतीची पहिली कार असणार आहे जी केवळ ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह लॉन्च केली जाणार आहे.
Invicto ही नवीन लॉन्च होणारी कार टोयोटाच्या TNGA-C प्लॅटफॉर्मवर आधारित असणार आहे. याचाच अर्थ मारूतीला यासाठी टोयोटा कंपनीला रॉयल्टी द्यावी लागेल. सीटिंग अरेंजमेंट बद्दल बोलायचे झाल्यास ही कार ७ किंवा ८ सीटर या व्हेरिएंटमध्ये लॉन्च केली जाऊ शकते.