भारतातील सर्वात मोठी कार निर्माता असलेली कंपनी मारूती सुझुकी लवकरच आपली सगळ्यात प्रीमियम कार ५ जुलै रोजी लॉन्च करणार आहे. कंपनी आजवरची सर्वात मोठी कार मारूती सुझुकी Invicto लॉन्च करणार आहे. लॉन्चिंग होण्यापूर्वी १९ जूनपासून कारच्या बुकिंगला सुरूवात होणार आहे. मारूती सुझुकी आणि टोयोटो यांच्या भागीदारीमध्ये तयार करण्यात आलेली ही चौथी कार असणार आहे.

Invicto ही नवीन कार टोयोटा इनोव्हा हायक्रॉस MPV आधारित असणार आहे. मारूती सुझुकीने या महिन्यात अधिकृतपणे कारच्या लॉन्चिंगबद्दल पुष्टी केली आहे. मात्र त्या आधी या कारबद्दल अनेक अफवा आणि इतर माहिती इंटरनेटवर प्रसिद्ध होत होती. Invicto ही कंपनीच्या ब्रँडचे पहिले मॉडेल असेल ज्याची किंमत २० लाखांपेक्षा जास्त असेल. याबाबतचे वृत्त Financial Express ने दिले आहे.

salman khan big boss 18 date time and new theme
Bigg Boss 18: सलमान खानचा शो केव्हा, कुठे पाहता येणार? जाणून घ्या प्रिमियरची तारीख अन् स्पर्धकांची नावं
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
YouTube Shorts to allow 3 minute videos
आता वेगाने व्हायरल होणार तुमची रील! ६० सेकंद नव्हे, बनवा ३ मिनिटांचे YouTube Shorts; समजून घ्या, नवीन अपडेटमध्ये होणार ‘हे’ तीन बदल
BMW CE 02 India Launch Date Revealed Bmw Launch New Electric Scooter Ce 02 In October 2024 Check Price & Features
BMW CE 02 इलेक्ट्रिक स्कूटर ऑक्टोबरमध्ये होणार लाँच; जाणून घ्या किंमत आणि फिसर्च
Kylaq SUV launch on November 6
Skoda SUV: Skoda च्या ‘या एसयूव्हीमध्ये रिव्हर्स घेण्यासाठी असणार खास फीचर; वाचा भारतात कधी लाँच होणार
Jio new recharg plan for 98 days
Jio Recharge Plan: ९८ दिवसांसाठी ओटीटी प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन फ्री; फक्त ‘हा’ रिचार्ज करा; किंमत जाणून घ्या
YouTube new pause ads feature Do not pause videos
गाणं ऐकताना सतत ॲड्स येतात? YouTube ने शोधला उपाय; आता pause न करता व्हिडीओ बघा
dark chocolate cinnamon coffee and green tea enough to reduce blood sugar
Blood Sugar : ग्रीन टी, डार्क चॉकलेट, दालचिनीमुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते का? काय खरं काय खोटं? जाणून घ्या तज्ज्ञांकडून

हेही वाचा : Mahindra Petrol Vehicles in May 2023: ‘या’ आहेत महिंद्राच्या टॉप ५ बेस्ट सेलिंग पेट्रोल SUV; जाणून घ्या कोणाचा आहे समावेश

Invicto चे डिझाईन आणि फीचर्स

Invicto ही नवीन कार टोयोटा इनोव्हा हायक्रॉस MPV आधारित असणार आहे. मारूती सुझुकीने या महिन्यात अधिकृतपणे कारच्या लॉन्चिंगबद्दल पुष्टी केली आहे. यामध्ये डिझाईनमध्ये किरकोळ बदल होऊ शकतात. ज्यामध्ये सुझुकीच्या लोगोसह एक नवीन ग्रील आणि पुन्हा नव्याने डिझाईन केलेले अलॉय व्हील्सचा समावेश आहे. फीचर्सच्या बाबतीत या प्रीमियम MPV कारमध्ये स्मार्टफोन कनेक्टिव्हीटीसह १०. १ इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, एक मोठा पॅनोरॅमिक सनरूफ मिळणार आहे. तसेच Advance असिस्टन्स सिस्टीम (ADAS ) चा सपोर्ट मिळणार आहे.

इंजिन आणि गिअरबॉक्स

लवकरच लॉन्च होणाऱ्या Invicto इनोव्हा हायक्रॉससह पॉवरट्रेनचा पर्याय मिळणार आहे. यामध्ये २.० लिटर, चार सिलेंडरचे पेट्रोल इंजिन मिळेल. जे १७१ बीएचपी आणि २०५ एनएम टॉर्क जनरेट करते. ज्याला CVT सह जोडण्यात आले आहे. दुसरे पॉवरट्रॅम एक TNGA 2.0 लिटरचे चार सिलेंडर असलेले हायब्रीड पेट्रोल युनिट देण्यात येणार आहे. जी ई-CVT ट्रांसमिशनशी जोडली जाईल.

हेही वाचा : Petrol-Diesel Price on 14 June: पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढले, पाहा तुमच्या शहरातील आजच्या किमती

किंमत आणि कोणाशी करणार स्पर्धा

५ जुलै रोजी भारतामध्ये Invicto लॉन्च होणार आहे. याची किंमत अंदाजे १८ ते ३० लाख (एक्स-शोरूम) रुपये असण्याची शक्यता आहे. यासाठी १९ जूनपासून बुकिंग सुरू होणार आहे. Invicto लॉन्च झाल्यावर हे मॉडेल Mahindra XUV700, Kia Carnival ची स्पर्धा करण्याची शक्यता आहे.