Maruti Suzuki Invicto gets over 6,200 pre-bookings: मारुती सुझुकीने आपली नवीन ८ सीटर कार Maruti Invicto देशांतर्गत बाजारात सादर केलीये. ही कार सध्याच्या टोयोटा इनोव्हा हायक्रॉसवर आधारित आहे. मात्र कंपनीने या कारच्या लूकमध्ये आणि फीचर्समध्ये बदल केल्याने ती इनोव्हा पेक्षा वेगळी दिसते. मारुती सुझुकीने अत्यंत महत्त्वाकांक्षेने इनव्हिक्टोची रचना केली आहे. मारुती सुझुकीची ही सर्वात महागडी कार आहे. या कारच्या हाय एंड मॉडेलची किंमत रु. २८.४२ लाख रुपये आहे. या महागड्या कारचे प्री-बुकिंग १९ जूनपासून सुरू आहे. कार लाँच होण्यापूर्वीच कंपनीला या प्रीमियम एमपीव्हीसाठी ६,२०० हून अधिक बुकिंग प्राप्त झाले आहेत.
२५,००० रुपयांच्या टोकन रकमेवर ही कार बुक करता येईल. या कारची डिलिव्हरी लवकरच सुरू होईल. मारुतीकडे आधीच सुमारे १० हजार युनिट्सचा स्टॉक आहे. टोयोटाच्या कर्नाटकातील बिदादी प्लांटमध्ये Maruti Invicto ची निर्मिती केली जात आहे.
(हे ही वाचा : कोणत्या रंगाच्या कारला अपघाताचा जास्त धोका असतो माहितेय का? रंगाचं नाव वाचून व्हाल चकित)
Maruti Invicto सुरक्षा वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे. ज्यामध्ये सहा एअरबॅग्ज टू हिल होल्ड असिस्ट, ABS, वाहन स्थिरता नियंत्रण, थ्री पॉइंट सीट बेल्ट, ३६० व्ह्यू कॅमेरा, TPMS तसेच पुढील आणि मागील चाकांवर डिस्क ब्रेक समाविष्ट आहेत.
कंपनीने ही MPV तीन व्हेरिएंटसह सादर केली आहे (Zeta + ७ सीटर, Zeta + ८ सीटर आणि Alpha +). मारुतीने ही एमपीव्ही हायब्रिड पॉवरट्रेनसह सादर केली आहे. ज्याचे इंजिन ६००० rpm वर ११२ kWh चा पॉवर आणि ४४०० rpm वर १८८Nm टॉर्क जनरेट करते. यामध्ये उपस्थित असलेली इलेक्ट्रिक मोटर ४००० rpm वर ८३.७३ kW ची पॉवर आणि २०६ Nm टॉर्क जनरेट करते. हे या कारला एकूण १३७ kW चे आउटपुट देण्यास सक्षम आहेत. कंपनीने या MPV साठी २३.२४ km/l मायलेजचा दावा केला आहे. तसेच इंधन टाकीची क्षमता ५२ लीटर आहे.